-
Onion Benefits : अनेकांना जेवण करताना तोंडी कच्चा कांदा खाण्याची सवय असते. तर काहींना कच्चा कांदा जेवणासोबत लागतोच. मात्र, कच्चा कांदा खावा की नाही असा अनेक जणांना पडलेला प्रश्न आहे. (फोटो : Freepik)
-
कांदा केवळ जेवणातच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कांद्याचा रस आणि कच्चा कांद्याचे अनेक फायदे होतात. (फोटो : Freepik)
-
सोडियम, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक कांद्यामध्ये आढळतात. हे सर्व मिळून कांदा एक सुपरफूड बनतो. (फोटो : Freepik)
-
कच्च्या कांद्यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीराला अनेक रोग आणि संक्रमणांपासून वाचवतात. (फोटो : Freepik)
-
कच्चा कांदा खाल्ल्याने दृष्टी सुधारते कारण त्यात व्हिटॅमिन ए, सी आणि ई आढळतात. कांदा डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे डोळ्यांची कमजोरी दूर करतात आणि त्यांना मजबूत ठेवण्यास मदत करतात. (फोटो : Freepik)
-
कच्चा कांदा मुरुम आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते. (फोटो : Freepik)
-
फ्लेव्होनॉइड्स आणि थायोसल्फिनेट्स नावाची संयुगे कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. हे दोन्ही हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. (फोटो : Freepik)
-
कच्च्या कांद्यामध्ये क्रोमियम असते, हे खनिज रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे असते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. (फोटो : Freepik)
-
कच्च्या कांद्यामध्ये सल्फर अँटीऑक्सिडंट असतात जे कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करतात. यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात जे शरीरातील कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस अडथळा आणतात. (फोटो : Freepik)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा