-
घरातली ती एक जागा असते जिथे बसणं,बोलणं सगळ्यांनाचं आवडतं. ती म्हणजे ‘बाल्कनी’. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आपण घर खरेदी करताना देखील बाल्कनी आहे ना हे आधी बघतो. जिथे आपण निवांत बसू आणि विचार करू शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर आज आपण बाल्कनी सजवण्यासाठी पाच टिप्स पाहणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हँगिंग बास्केट किंवा पॉट्स : अश्या प्रकारच्या बास्केट किंवा पॉट्स हुक लावून लटकवण्यात येतात. अश्या बास्केटमध्ये कमी उंचीची आणि पसरणारी झाडे लावण्यात येतात. तुमच्या बाल्कनीच्या बागेत रोपे वाढवण्यासाठी हे उत्कृष्ट ठरेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बशी किंवा प्लेट वापरा : झाडांना घातलेलं पाणी कुंड्यांच्या होलमधून बाहेर येते आणि तुमची बाल्कनी अस्वच्छ आणि घाण होऊ शकते. पाणी साठवून ठेवण्यासाठी कुंड्यांच्या खाली खाली बशी किंवा प्लेट ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जुने मग वापरा: जुने कॉफी किंवा चहाचे मग किंवा कप लहान रोपांसाठी प्लांटर किंवा कुंडी म्हणून तुम्ही बाल्कनीमध्ये वापरून एक मिनी सेटअप करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कोरफड यासारखी झाडे तुम्ही तुमच्या बागेत लावू शकता. कारण – यांची देखभाल करणे सोपे असते तसेच या झाडांना वाढण्यासाठी पाणी सुद्धा कमी लागते आणि या तुमच्या बागेत आकर्षक सुद्धा दिसतील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बसण्याची व्यवस्था : कॉफी, चहाचा आनंद घेण्यासाठी किंवा निसर्गाच्या सान्निध्यात एखादे पुस्तक वाचण्यासाठी तुमच्या बाल्कनी बागेत आरामशीर बसण्याची व्यवस्था करू शकता. यासाठी तुम्ही टेबल-खुर्च्या, फोल्डिंग चेअर, झोपाळे, ग्रीन ग्रास आदींचा उपयोग करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”