-
हिवाळ्यात दही खाणे योग्य आहे की नाही, याबाबत अनेकांची वेगवेगळी मते आहेत. त्यामुळे लोक सहसा विचार करतात की हिवाळ्यात दही खावे की नाही.
-
दही खाण्याशी संबंधित तुमच्या प्रश्नांची उत्तरे आणि हिवाळ्यात दही खाण्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, याविषयी तज्ज्ञांनी काय उत्तरं दिली आहेत, याविषयी तुम्हाला आज आम्ही माहिती देत आहोत.
-
दही थंड असते असा लोकांचा गैरसमज आहे. खरंतर, हिवाळ्यात दही गरम असल्याने सेवन करणे चांगले मानले जाते. त्याचाही शरीरावर चांगला परिणाम होतो.
-
हिवाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात दह्याचा समावेश करू शकता. कारण दही तुम्हाला सर्दीपासून आराम देते. दह्यात निरोगी प्रो-बायोटिक्स देखील असतात, जे तुमच्या आतड्यांसाठी आवश्यक असतात.
-
दही पचनाला चालना देते आणि चयापचय वाढविण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरात अंतर्गत उष्णता निर्माण होण्यास मदत होते. हे प्रो-बायोटिक्स पचनास मदत करतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात.
-
जर तुम्हाला थंडीच्या दिवसात सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल तर फ्रिजमधून सरळ दही खाणे टाळा, अन्यथा काही समस्या निर्माण होऊ शकतात, यावर उपाय म्हणून काळी मिरी पावडरसोबत दही खाल्ल्यास घसा दुखत नाही.
-
दह्यामधील प्रो-बायोटिक्स चांगल्या कोलेस्टेरॉलच्या पातळीशी संबंधित आहेत, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
-
दररोज एक कप दही खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते. खरंतर योग्य प्रमाणात दही खाल्ल्यास शरीराला अनेक प्रकारे फायदा मिळू शकतो.
-
दह्यामध्ये बायोएक्टिव्ह पेप्टाइड्स असतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (फोटो सौजन्य : freepik)

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक