-
आजकाल कोणाच्या घरात गॅस सिलेंडर नाही, असे नाही. पूर्वीच्या काळी लोक स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर करत होते. पण, आजकाल प्रत्येकाच्या घरात गॅस सिलेंडर हा असतोच. (Photo: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गॅस सिलेंडर वापरणे खूपच सोईस्कर झाले आहे. पण, जितके गॅस सिलेंडर वापरणे सोपे आहे तितकाच तो काळजीपूर्वक हाताळणे देखील महत्त्वाचे आहे.(फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
कारण एखादा गॅस लिकेज असेल तर गॅस गळती होण्याची शक्यता असते. यामुळे स्फोट देखील होऊ शकतो. त्यामुळे गॅस हाताळण्यापूर्वी खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे. (फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. यावरुन तुम्ही अगदी सहजरित्या गॅस सिलेंडरमधून गळती होत आहे की नाही हे तपासू शकता.(फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही लिकेज गॅस ओळखू शकता, तुम्हाला काय करायचंय तर… सिलेंडरमध्ये रेग्युलेटर असलेल्या ठिकाणी थोडे पाणी टाकावे.(फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
सिलेंडरवर जे पांढऱ्या रंगाचं झाकणं (रेग्युलेटर)असतं ते काढा. त्यात तुम्हाला एक होल दिसेल त्यात एक चमचा पाणी टाका आणि त्यावर वाटी ठेवा.(फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
वाटीनं ते झाकल्यानंतर २, ते ३ मिनिटांनी ती वाटी काढा आणि जर बुडबुडे येत असतील तर समजा तुमचा सिलेंडर लिकेज आहे.(फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील सिलेंडर गळत आहे की नाही ते वास घेऊन तपासू शकता. जर तुम्हाला थोडेसेही असे वाटत असेल तर गॅस रेग्युलेटरजवळ आणि पाईप जॉइंटच्या ठिकाणी वास घ्यावा लागेल. (फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)टीम)
-
असे केल्याने तुम्ही गॅस गळती झाली आहे का हे पाहू शकाल.आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्याची मदत आपल्याला होऊ शकते, फक्त त्याचा योग्य उपयोग आपल्याला माहिती नसतो.(फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ