-
फक्त पुण्यातीलच नाही तर पु्ण्याजवळ सुद्धा फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पुण्याजवळ फिरण्यासाठी चांगली ठिकाणे सुचवित असतात. (Photo : Social Media)
-
पुणे हे देशातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू पुण्याच्या सौंदर्यात भर घालतात. (Photo : Social Media)
-
शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे इतर अनेक गोष्टींसाठी लोकप्रिय आहे. पुण्याची मिसळ असो की पुणेरी पाट्या नेहमी चर्चेत असतात. (Photo : Social Media)
-
शनिवारवाडा, नाना वाडा, केळकर म्युझियम, दगडूशेठचा गणपती, पर्वती टेकडी, बाणेर टेकडी, तुळशीबाग, लाल महाल, चतुशृंगी मंदिर असे अनेक ठिकाणे आहेत जे पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाने बघितले पाहिजे. (Photo : Loksatta)
-
१. सिंहगड किल्ला – सिंहगड किल्ला हा पुणे शहरापासून फक्त ३०-२५ कि.मी अंतरावर आहे. ही पुण्यातील ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तू आहे. (Photo : Loksatta)
-
२.पवना तलाव – पवना तलाव हे पुण्यापासून ५० किमी अंतरावर आहे. वनडे ट्रिपसाठी हे बेस्ट ठिकाण आहे. या तलावाजवळ कॅम्पिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. (Photo : Social Media)
-
३.लोणावळा – लोणावळा हे पुण्यापासून ६५ किमी अंतरावर आहे. तुम्ही पावसाळा आणि हिवाळ्यात लोणावळ्याला भेट देऊ शकता. थंड हवेचे ठिकाण असलेले लोणावळा प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. (Photo : Social Media)
-
४. राजगड किल्ला – गडांचा राजा आणि राजांचा गड अशी ओळख असलेला राजगड किल्ला हा पुण्यापासून ४८ किमी अंतरावर आहे.हा किल्ल्याला सुद्धा तुम्ही अवश्य भेट देऊ शकता. (Photo : Social Media)
-
५. खडकवासला धरण – पुण्यापासून खडकवासला धरण फक्त २० किमी अंतरावर आहे.खडकवासला धरणातूनच पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. खडकवासला एक दिवसाच्या सहलीसाठी योग्य पिकनिक स्पॉट आहे. (Photo : Social Media)

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली