-
बदलत्या वातावरणामुळे अनेकांना केसांसंबंधित समस्यांना तोंड द्यावे लागतेय. त्यातही बहुतांश लोक केसगळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. अशावेळी केसांची काळजी कशी घ्यावी समजत नाही. (photo – freepik)
-
दरम्यान आहारतज्ज्ञ लीमा महाजन यांनी एका इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून केस गळतीवर बदाम तेल, मोहरीचे तेल, कढीपत्ता, मेथीचे दाणे यांच्यापासून घरच्या घरी तयार केलेले एक नैसर्गिक तेल फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले आहे. (photo – freepik)
-
पण, खरेच हे नैसर्गिक तेल केसांच्या वाढीस उपयुक्त ठरू शकते का, यावर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुंबईतील भाटिया रुग्णालयाचे त्वचाशास्त्रज्ञ, कॉस्मेटोलॉजिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ व केस प्रत्यारोपण सर्जन डॉ. सौरभ शाह यांनी सविस्तर माहिती दिली आहे. (photo – freepik)
-
एका अभ्यासानुसार, रोझमेरी तेल केसांसाठी उत्तम काम करते. या तेलाचा रोज वापर केल्यास तीन ते सहा महिन्यांत परिणाम दिसू लागतात. मेथीचे दाणे केसांच्या मुळांचे पोषण करून आणि टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढतात. तसेच केसांच्या वाढीस मदत करतात. (photo – freepik)
-
मेथीच्या दाण्यांमध्ये असलेली प्रथिने केसांची मुळे मजबूत करून, केसगळती कमी करतात आणि निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. तसेत कढीपत्त्यात असलेली प्रथिने आणि बीटा कॅरोटीनमुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते, असे आहारतज्ज्ञ महाजन म्हणाल्या. (photo – freepik)
-
केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर आहे. मोहरीचे तेल कोरड्या आणि निर्जीव केसांना पोषण देते. त्यात अल्फा फॅटी ॲसिड असते; जे केसांना ओलावा पुरवतात. तसेच केसांना ते नॅचरल कंडिशनिंग इफेक्ट देतात. (photo – freepik)
-
मोहरीच्या तेलाने केसांना, तसेच टाळूला मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि तुटत नाहीत. मोहरीच्या तेलातील लिनोलेनिक ते ओलिक अॅसिडचे प्रमाण केस हायड्रेटेड आणि निरोगी ठेवतात, असे डॉ. शाह म्हणाले. (photo – freepik)
-
मेथीचे दाणे निरोगी केसांसाठी फायदेशीर असतात. त्यामध्ये असलेले प्रोटीन आणि निकोटिनिक अॅसिड (व्हिटॅमिन बी) केसांना आतून पोषण देण्यास मदत करतात. त्यामुळे केस गळणे आणि कोंड्याची समस्या दूर होते, असे डॉ. शाह म्हणाले. (photo – freepik)
-
बदामाचे तेल आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. हलके आणि जलद शोषणाऱ्या तेलाच्या वापराने केसांची लांबी लवकर वाढते. केस दाट आणि काळेभोर होतात. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ७, व्हिटॅमिन ई, एसपीएफ ५, बायोटिन, अँटीबॅक्टेरियल घटक आढळतात; जे केसांना खोलवर कंडिशनिंग देत चमकदार, मजबूत व घनदाट बनवतात. (photo – freepik)
-
डॉ. शाह यांच्या मते, हे नैसर्गिक तेल केसांच्या सामान्य समस्यांबरोबरच इतर गंभीर समस्यांवर उपचार करण्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. त्यात कोरड्या केसांची समस्या, टक्कल पडणे, केस पातळ होणे, अकाली केस पांढरे होणे अशा अनेक समस्यांना नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. (photo – freepik)
-
तरीही केसांवर कोणत्याही प्रकारचे तेल, मास्क लावण्यापूर्वी तुम्ही योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण- प्रत्येकाच्या केसांची पोत, रचना वेगवेगळी असते. त्यामुळे केसांवर कोणतेही उपाय करण्यापूर्वी योग्य अशा तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. (photo – freepik)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा