-
फेब्रुवारी महिन्यातील १४ फेब्रुवारी या दिवसाला खूप महत्त्व येऊ लागलंय. प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलंय असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. (फोटो: Freepik)
-
अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही, मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते. मग गुलाबाची फुलं, गिफ्ट्स, भेटकार्ड, भेटवस्तू काय द्यायचा या गोंधळात तरुणाई गिफ्टशॉपमध्ये दिसतेच. (फोटो: Freepik)
-
खरंतर वर्षाचे ३६५ दिवस हे प्रेमाचे असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है! अशावेळी आपल्या प्रियजनांना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी काही अनोख्या भेटवस्तू द्यायच्या असतील तर हे ऑप्शन बघा. (फोटो: Freepik)
-
फुले मुलींना नेहमीच आवडतात. त्यांना केवळ महागड्या वस्तू दिल्यावरच त्या इम्प्रेस होतात हा काहींचा गैरसमज आहे. त्या तुम्ही दिलेल्या एखाद्या आकर्षक पुष्पगुच्छामुळेही इम्प्रेस होतात. त्यामुळे तुम्ही व्हॅलेंटाइन डे दिवशी आपल्या गर्लफ्रेंडला गुलाबाचं किंवा इतर कोणतही आकर्षक दिसणारं फुलं घेऊ शकता. (फोटो: Freepik)
-
परफ्यूम- आधी सांगितल्याप्रमाणे मुलींना सजायला कार्यक्रमात मिरवायला खूप आवडत त्यामुळे त्यांना परफ्यूम वापरायला खूप आवडतं.मुलींनाही परफ्यूम खूप आवडतात त्यामुळे तुम्ही ते देखील गिफ्ट म्हणून देऊ शकता. (फोटो: Freepik)
-
चॉकलेट –सेफ गिफ्टच्या यादीत चॉकलेटचे देखील नाव येते. मुलींना चॉकलेट्स खूप आवडतात, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यांच्यासाठी चॉकलेट बॉक्स घेऊन जाऊ शकता. (फोटो: Freepik)
-
पुस्तके –जर तुमची प्रिय व्यक्ती पुस्तकप्रेमी असतील. त्यांना चांगली पुस्तके भेट द्या. (फोटो: Freepik)
-
फॅशन ज्वेलरी – गिफ्ट असे असावे की ते थेट हृदयापर्यंत जाईल आणि प्रेयसीला भावेल तर ते गिफ्ट म्हणजे ज्वेलरी. मुलींना दागिने आवडणार नाही असं होऊच शकत नाही. (फोटो: Freepik)
-
आवडीनुसार द्या गिफ्ट – वरील गिफ्ट्सपैकी तुम्हाला काहीच पसंत नसेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या आवडीनुसार त्या संबंधित गिफ्ट देऊ शकता. ज्यामध्ये कोणाला गायणाची आवड असेल किंवा वाचनाची तर त्या कलेशी निगडीत गिफ्ट तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. (फोटो: Freepik)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य