-
नथ हा एक महाराष्ट्रीयन दागिना आहे. महाराष्ट्रीयन महिला लग्नसमारंभ किंवा शुभ कार्यात आवर्जून परिधान करतात. नऊवारी नेसून नाकात घातलेल्या नथीमुळे एक आगळा वेगळा पारंपारिक लूक दिसून येतो. (Photo : Maharashtrian Nath/ Instagram)
-
हल्ली दिवसेंदिवस वेगवेगळ्या वेशभूषेवर नथ घातली जाते. साडी असो किंवा नऊवारी, जीन्स कुर्ती असो किंवा सलवार मुली आवडीने नथ घालतात. (Photo : Maharashtrian Nath/ Instagram)
-
नथीमध्ये सुरुवातीला मोती, हिरे आणि मणी असायचे. आता यात अनेक वेगवेगळ्या डिझाइन पाहायला मिळतात. (Photo : Maharashtrian Nath/ Instagram)
-
वेस्टर्न कपड्यांवर घालण्यासाठी किंवा साडीवर किंवा नऊवारीवर शोभेल असे गोल्ड सिल्वर पॉलिश दिलेली नथ दिसून येते. सिल्वर पॉलिश दिलेल्या नथीला विशेष मागणी आहे. (Photo : Maharashtrian Nath/ Instagram)
-
मोत्यांचा वापर न करता वेगवेगळ्या रंगांच्या मण्यांपासून सुंदर नथीचे डिझाइन पाहायला मिळतात. (Photo : Maharashtrian Nath/ Instagram)
-
सध्या नथीमध्ये एक नवीन ट्रेंड आला. तुम्ही नथीमध्ये जोडीदाराचे नाव सुद्धा कोरू शकता. तुमच्या जोडीदाराच्या नावाची प्लेट टाकून तुम्ही नथीची डिझाइन बनवू शकता. (Photo : Maharashtrian Nath/ Instagram)
-
पांढरे शुभ्र मोतींचा वापर करुन तुम्ही फोटोत दाखवल्याप्रमाणे सुंदर नथ घेऊ शकता. (Photo : Maharashtrian Nath/ Instagram)
-
नथीचा हा आगळा वेगळा प्रकार सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. ही डिझाइन अतिशय सुरेख आणि दिसायला भारदस्त दिसते. (Photo : Maharashtrian Nath/ Instagram)
-
फॅन्सी साडी किंवा फ्युजन स्टाइल नऊवारीवर तुम्ही ही नथ घालू शकता. हा लूक खूप उठून दिसेल. (Photo : Maharashtrian Nath/ Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”