-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठीही तितकीच प्रसिद्ध आहे.
-
ती एक उत्तम योगा ट्रेनर आहे.
-
नियमित योगाच्या माध्यमातून तिने तिचं शरीर सुडौल बनवलं आहे. त्यामुळे ती इतरांनाही नियमित व्यायामाचा सल्ला देते.
-
ती तिचे निरनिराळे व्यायामाचे प्रकार तिच्या सोशल मीडिया खात्यावर टाकत असते.
-
तिने दिलेले व्यायामाचे टीप्स वाचणाराही एक मोठा चाहता वर्ग आहे.
-
त्यामुळे तिने आजही एक नवा योगा प्रकार तिच्या चाहत्यांना सांगितला आहे.
-
शिल्पा म्हणते की हा प्रकार दिसायला खूप सोपा असला तरी प्रभावी आहे.
-
या व्यायामप्रकारामुळे मेंदूचा रक्त प्रवाह वाढतो, केस गळती कमी होते, मज्जासंस्था नियंत्रित राहतात आणि मन-शरीर कनेक्शन सुधारतं. हे आसनात्मक स्नायूंची ताकद देखील सुधारते.
-
कसा कराल हा व्यायाम प्रकार? आधी जमिनीवर भिंतीच्या दिशेने पाय ठेवून झोपून घ्या. मग हळूहळू पाय भिंतीला वरच्या दिशेने लांबवा.
-
पाय जितके ताणता येतील तितके ताणून भिंतीला चिटकवा. त्यानंतर हळूहळू एका बाजूला वळा, त्यानतंर दुसऱ्या बाजूला वळा.
-
असा प्रयोग नियमित केल्यास तुम्हाला तुमच्या शरीरात झाेलेले बदल लगेच कळतील.
-
तिच्या या पोस्टवर अनेक कॉमेंट्सही आले आहेत. हा व्यायामप्रकार परिणामकारक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. (सर्व फोटो – शिल्पा शेट्टी/Instagram)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड