-
दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. पोषक आहार नीट न घेणे किंवा नियमित व्यायाम न करणे, यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. (Photo : Freepik)
-
आपल्यापैकी बऱ्याच लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्तीची कमतरता जाणवते, यामुळे आणखी आरोग्याच्या समस्या वाढतात; पण आहारात तुम्ही जर थोडे फार बदल केले तर तुम्हाला फरक जाणवू शकतो. त्यापैकी एक म्हणजे मनुके. (Photo : Freepik)
-
मनुके खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तुम्हाला माहिती आहे का मनुके रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्यानंतर त्याचे पौष्टिक मूल्य वाढते. याबाबत द इंडियन एक्स्प्रेसनी हैद्राबाद येथील यशोदा हॉस्पिटलचे सल्लागार जनरल फिजिशियन डॉ. रंगा संतोष कुमार यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली आहे. (Photo : Freepik)
-
डॉ. रंगा संतोष कुमार सांगतात, “मनुका रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्याने त्याचे पौष्टिक मूल्य वाढते, ज्यामुळे पचनशक्ती वाढते. याशिवाय या मनुकांमुळे कोरडा खोकला आणि श्वास घेताना होणारा त्रास दूर होतो.” (Photo : Freepik)
-
मनुक्यामध्ये असलेली साखर शरीराला ऊर्जा पुरविते. याबाबत हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ. दिलीप गुडे द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “रात्री मनुके ज्या पाण्यात भिजवतात ते पाणी सकाळी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. या पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.” (Photo : Freepik)

मनुके भिजवल्यामुळे ते मऊ होतात आणि पचायला सोपे जातात. याशिवाय बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. मनुके खाल्ल्याने शरीरात फायबरचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पचनशक्तीवर चांगला परिणाम दिसून येतो. (Photo : Freepik)
-
मनुक्यांमध्ये फायबर आणि पचनासाठी गरजेचे असलेले पौष्टिक घटक असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करतात आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून दूर ठेवतात. डॉ. गुडेसुद्धा याबाबत सहमत असल्याचे सांगतात. (Photo : Freepik)
-
मनुक्यांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. जेव्हा आपण मनुके भिजवतो तेव्हा लोहाची शोषण क्षमता आणखी वाढू शकते. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांनी याचे सेवन करावे. मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात, ज्यामुळे आपण तणावमुक्त जीवनशैली अंगीकारू शकतो. (Photo : Freepik)
-
मनुक्यांमध्ये असलेली नॅचरल साखर लगेच शरीरातील ऊर्जा वाढवते आणि पाण्यात भिजवलेल्या मनुकांचे सेवन केल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहते. (Photo : Freepik)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न