-
मेष : शुक्राचे अधिपत्य असलेली तूळ रास मेष राशीच्या उत्कट ऊर्जा संतुलित करते, तसेच रोमँटिक संबंधांसाठी त्यांना एक परिपूर्ण भागीदार बनवते. कारण त्यांना लाड करून घेणे आणि तणावमुक्त राहणे आवडते. म्हणूनच यंदाच्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त मेष आणि तूळ राशीचे लोक एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवू शकतात.
-
वृषभ : वृश्चिक राशी एक उत्कृष्ट निरीक्षक आणि परिपूर्ण नियोजक आहे, त्यामुळेच ते वृषभ राशीची ऊर्जा उत्तम प्रकारे व्यवस्थापित करू शकतात. वृश्चिक राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते. तसेच, ते त्यांच्या भावनांबद्दल खूप सावध असतात.
-
मिथुन : या राशीवर बुध ग्रहाचे राज्य असते. ते नेहमीच द्विधा मनस्थितीत असतात किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्व दुहेरी असते. ते नेहमीच कल्पनेच्या जगत वावरत असतात. धनू राशी मिथुन राशीचा हा स्वभाव हाताळण्यासाठी अतिशय योग्य आहे. धनु राशीचे लोक या लोकांना खऱ्या आयुष्यातील वेगवेगळ्या साहसी गोष्टी दाखवून देऊ शकतात. धनू राशीच्या लोकांना नवीन लोकांना भेटणे, नवीन गोष्टींचा प्रयत्न करणे आणि नवीन गोष्टी शोधणे आवडते.
-
कर्क राशीचे लोक अतिशय संवेदनशील आणि भावनिक असतात. मकर राशीचे लोक संवेदनशील स्वभावाची आणि भावनांची काळजी घेणारे असल्यामुळे त्यांच्याशी कर्क राशीच्या लोकांचे चांगले जमू शकते. मकर राशीचे लोक अतिशय व्यावहारिक असतात. मकर राशीची एक खास गोष्ट म्हणजे जेव्हा ते प्रेमात असतात तेव्हा ते आपला वेळ आणि शक्ती पूर्ण निष्ठेने आपल्या प्रिय व्यक्तीसाठी देतात.
-
सिंह राशीचे लोकांचा शाही आयुष्य जगण्याकडे कल असतो. त्यांना शिस्त आणि मौलिकता आवडते. कुंभ राशीमध्ये सिंहाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची वैशिष्ट्ये आहेत. कुंभ राशींना त्यांचे प्रेम दाखवणे आवडत नाही परंतु ते त्यांच्या जोडीदारावर निष्ठेने प्रेम करतात. त्यांच्या मनात नातेसंबंधांबद्दल स्पष्ट स्पष्टता असते.
-
कन्या राशीचे लोक अतिशय व्यावहारिक असतात. अनेकदा त्यांना परफेक्शनिस्ट म्हटले जाते. म्हणूनच मीन राशीचे लोक त्यांच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात. मीन राशीचे लोक आशावादी आणि रोमँटिक असतात. त्यांच्यात सकारात्मक दृष्टीकोन असतो. कन्या देखील एक प्रेमळ रास आहे आणि त्यांना कोणीतरी त्यांची काळजी घेतलेली आवडते. कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तिबरोबर जवळच्या ठिकाणी चांगला वेळ घालवायला आवडते आणि मीन राशीचे लोक त्यांची ही इच्छा पूर्ण करू शकतात.
-
तूळ : शुक्राचे अधिपत्य असलेले तूळ राशीचे लोक जन्मतः रोमँटिक असतात आणि ते सौंदर्याची प्रशंसा करतात. ते नेहमी काम आणि आयुष्याचा संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांच्या जोडीदाराने व्हॅलेंटाईन डेसाठी सर्व योजना आखल्या तर त्यांना ते आवडेल. म्हणूनच मेष राशीचे लोक तुळ राशीसाठी सर्वोत्तम ठरू शकतात कारण मेष राशीचे लोक उत्साही आणि रोमँटिक असतात. त्यांना त्यांच्या प्रियकरांसाठी योजना आखणे आवडते. तसेच ते खूप काळजी घेणारे आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व आहेत.
-
वृश्चिक : वृश्चिक रास अत्यंत भावनाप्रवण म्हणून ओळखले जातात आणि त्यांना त्यांच्या जोडीदारासह घनिष्ठ नातेसंबंधाची इच्छा असते. त्यामुळे वृषभ राशीबरोबर त्यांची उत्तम जोडी बसू शकते. कारण वृषभ हे कामुक प्रेमी असू शकतात. व्हॅलेंटाईन डे सारख्या विशेष प्रसंगी, वृश्चिक राशीच्या लोकांना स्वतःचे लाड करून घेण्याची इच्छा असू शकते. ते त्यांच्या जोडीदाराशी जवळीक साधू शकतात आणि वृषभ त्यांची ही इच्छा पूर्ण करू शकतात.
-
धनु: अत्यंत आशावादी, सकारात्मक आणि साहसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनु राशीसाठी मिथुन राशीचे लोक उत्तम साथ देऊ शकतात. मिथुन राशीचा स्वभाव लवचिक असतो. ते कोणत्याही परिस्थितीत आरामात सामावून जाऊ शकतात. मिथुन राशीचे लोक संवादातही चांगले असतात, त्यामुळे ते धनु राशीच्या जिज्ञासू स्वभावाचा सहज सामना करू शकतात.
-
मकर : मकर राशीवर शनीचे राज्य असते, म्हणून ते नातेसंबंधात व्यावहारिकतेचे घटक आणतात. परंतु जेव्हा मकर प्रेमात असतात तेव्हा ते त्यांचा वेळ, शक्ती आणि स्वतःला त्यांच्या प्रियकरासाठी समर्पित करतात. या स्वभावासाठी कर्क रास एक परिपूर्ण जुळणी आहे. कर्क राशीचे लोक भावनिक असतात. ते अधूनमधून मकर राशीच्या लोकांचे कठोर वर्तन देखील समजून घेऊ शकतात.
-
कुंभ : हे लोक स्वतंत्र विचारसरणीचे असतात. त्यांना सरप्राइज आवडते. ते विचार प्रक्रिया आणि हेतूंना महत्त्व देतात. त्यांचा स्वभाव सिंह राशीसाठी योग्य आहे कारण सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय शाही आणि निष्ठावान असतो. सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदारांचे लाड करायला आवडतात. व्हॅलेंटाईन डे ला, त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीला आश्चर्यचकित करायला आवडेल.
-
मीन : या राशीचे राशीचे लोक अत्यंत अंतर्ज्ञानी आणि भावनाप्रधान असतात. त्यांना काय काय करायचे असते याचा ते औरं विचार करतात. एखाद्या टेकडीवरून सुंदर सूर्यास्त पाहणे हा त्यांचा दिवसाचा आवडता क्रियाकलाप असू शकतो. अशा स्वभावामुळे त्यांना व्यावहारिकतेची आवश्यकता असते. त्यामुळेच कन्या मीन राशीसाठी एक परिपूर्ण जुळणी आहे. कन्या एक व्यावहारिक आणि परिपूर्णतावादी रास आहे. मीन राशीची इच्छा पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात असते. ते प्रामाणिक असतात आणि इतरांच्या भावनांची काळजी घेतात. ते त्यांचे प्रेम व्यक्त करण्यात विश्वास ठेवतात आणि त्यांच्या जोडीदाराला खूप आदर देतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर