-
Hair care tips in winter: केसांचा वारंवार गुंता होणे ही प्रत्येक महिलेला थंडीच्या दिवसात येणारी समस्या आहे. या दिवसांत केस लहान असो किंवा लांब त्यात कमी अधिक प्रमाणात गुंता होतोच. (Photo: Freepik)
-
हेअर स्टाइल्स, सतत आयनिंग किंवा ड्रायरचा करण्यात येणारा वापर, याशिवाय इतर हेअर स्टायलर टूल्सचा वापर यामुळे केसांचा गुंता होतो.(Photo: Freepik)
-
केसांचा गुंता सोडवत असताना खूप त्रास होतो त्याचबरोबर खूप केसही गळतात. अशावेळी केसांचा गुंता सोडवणे खूप कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत केसातील गुंता सोडवण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.(Photo: Freepik)
-
कोणत्याही स्त्रीच्या सौंदर्याला चार चाँद लावण्याचे काम करतात, ते मऊशार, काळेभोर आणि चमकदार केस. जर तुमची टाळू प्रदूषण, घाण यांच्या संपर्कात आली असेल किंवा तुमच्या टाळूवर घाम साचला असेल तर तुमचे केस स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला दररोज केस धुणे आवश्यक आहे.(Photo: Freepik)
-
सध्या प्रदूषण, घाण आणि काजळी यामुळे केसांसाठी दिवस खराब असतात. केस निरोगी आणि स्मूथ ठेवण्यासाठी प्रत्येक स्त्रीला केसांसाठी बेस्ट कंडिशनरची गरज असते.(Photo: Freepik)
-
केसांना तेल लावणं चांगलं आहे. पण केस धुवण्यापूर्वी फक्त १ किंवा २ तास आधी तेल लावल्यामुळे केस चांगले राहतात. (Photo: Freepik)
-
रात्री तेल लावणे आणि सकाळी धुवणे… ही सवय चांगली नाही. असं केल्यास केस कमजोर होतात आणि तुटू लागतात.(Photo: Freepik)
-
केसांच्या गुंता सोडवताना सर्वप्रथम केसांच्या खालच्या बाजूने गुंता सोडवायला सुरुवात करावी. केसांच्या खालच्या बाजूने केसांची गुंता सोडवत हळुहळु वर मुळांजवळ येऊन हलक्या हाताने गुंता सोडवावी.(Photo: Freepik)
-
केसांच्या वरच्या बाजूने म्हणजेच मुळांपासून गुंता सोडवण्याची चूक करु नका. सगळ्यात आधी खालच्या बाजूने गुंता सोडवत हळुहळु वर जावे. (Photo: Freepik)

८ एप्रिल पंचांग: दुःख दूर होणार ते शुभ फळ मिळणार; कामदा एकादशीला भगवान विष्णू कोणत्या राशीला पावणार? वाचा राशिभविष्य