-
लहान मुली, तरुणी असो किंवा महिला आपले केस सुंदर आणि चमकदार असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, केसांची काळजी नीट योग्य पद्धतीने घेतली नाही तर केस गळण्यास सुरुवात होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यामुळे केसांच्या संरक्षणासाठी त्यांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कामावरून रात्री उशिरा आल्यावर, घर आवरून झाल्यावर आपण लगेच झोपून जातो. पण, रात्री झोपण्यापूर्वी आपण केसांची योग्य ती काळजी घेऊन पुढीलप्रमाणे काही गोष्टी केल्या पाहिजेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. सॅटिनची उशी वापरा: ज्या लोकांना केस गळण्याची समस्या आहे, त्यांनी सॅटिनची उशी वापरा. रात्री झोपताना मऊ सॅटिन उशी तुमच्या केसांना इजा पोहचवणार नाही. सॅटिनच्या उशीवर झोपल्यास केसगळतीपासून सुटका मिळते आणि रात्री शांत झोपही लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. झोपण्यापूर्वी तुमचे केस विंचरून घ्या : रात्री केस विंचरून झोपावे ज्यामुळे केसांचा गुंता होत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. रात्री झोपताना रबर बँड आणि केसांना क्लिप लावल्यामुळे तुमच्या केसांवर आणि टाळूवर ताण येऊ शकतो. त्याऐवजी स्क्रंचची (Scrunchies) निवड करा कारण यामुळे केस तुटणे टाळण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. केसांना तेल लावा : केस गळणे, फाटे फुटणे आदी समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मध्यभागी आणि टोकांना तेल लावून मसाज करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. ओले केस असताना झोपू नका : बहुतेक लोक रात्री अंघोळ केल्यावर केस ओले असताना तसेच झोपून जातात. ही सवय केस गळण्याचे कारण बनू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral