-
समाधानी असणारी व्यक्ती आयुष्यात सुखी असते; पण काही असे लोक असतात ज्यांच्याजवळ सर्व काही असूनसुद्धा ते लोक दु:खी असतात. (Photo : Freepik)
-
ज्योतिषशास्त्रानुसार अशा पाच राशी आहेत; ज्या कधीही समाधानी नसतात आणि नेहमी दु:खी राहतात. (Photo : Freepik)
-
आज आपण त्या राशींविषयी जाणून घेऊ या … (Photo : Freepik)
-
मेष
मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ असतो. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती खूप साहसी आणि उत्साही असतात. हे लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात. ते नेहमी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टींमध्ये ते कधीही आनंदी आणि समाधानी नसतात. (Photo : Loksatta) -
मिथुन
मिथुन राशीचे लोक नेहमी दु:खी असतात. आपण काय करीत आहोत यापेक्षा इतर लोक काय करीत आहेत याकडेच त्यांचे जास्त लक्ष असते. त्यांना इतरांचा हेवा वाटतो. त्यामुळे या राशीचे लोक कधीही समाधानी आणि आनंदी नसतात. (Photo : Loksatta) -
कन्या
कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. ते खूप रहस्यमयी स्वभावाचे असतात. त्यांच्या मनात आणि ओठांवर काही वेगवेगळे असते. ते कधीही आयुष्यात समाधानी नसतात. त्यांना नेहमी इतरांजवळ असलेल्या गोष्टींविषयी जास्त आकर्षण असते. (Photo : Loksatta) -
मकर
मकर राशीचा स्वामी ग्रह शनी असतो. या राशीच्या लोकांच्या खूप जास्त अपेक्षा असतात. त्यामुळे ते कधीही समाधानी नसतात. ही व्यक्ती नेहमी प्रत्येक गोष्टीत चुका शोधत असते. त्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे काहीही होत नसल्याची जाणीव त्यांना होते. याच कारणामुळे ते नेहमी दु:खी असतात. (Photo : Loksatta) -
मीन
मीन राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे. या राशीची व्यक्ती नेहमी अस्वस्थ राहतात. हे लोक आपल्याच विश्वात असतात; ज्यामुळे ते अनेकदा काही गोष्टींचा पूर्णपणे आनंद घेऊ शकत नाही. या व्यक्ती कधीही समाधानी नसतात. हे लोक खूप जास्त भावनिक असल्यामुळे ते नेहमी दु:खी असतात. (Photo : Loksatta)
