-
लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना हल्ली चष्मा लागलेला आहे. चष्म्याच्या मदतीने आपण डोळ्यांच्या समस्यांपासून स्वत:ला वाचवू शकतो. (Photo : Freepik)
-
चष्मा वापरणारे लोक चष्म्यांना खूप जपतात. कारण- चष्मा हा अत्यंत नाजूक असतो; पण अनेकदा आपण चष्म्याची लेन्स चांगल्या रीतीने स्वच्छ करीत नाही. चष्म्याच्या लेन्सची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. (Photo : Freepik)
-
अनेकदा चष्म्यावर साचलेली धूळ कशी स्वच्छ करावी, हे कळत नाही आणि या मुळे कालांतराने चष्मा अस्वच्छ दिसायला लागतो. (Photo : Freepik)
-
अनेकदा लोकं चष्मा स्वच्छ करण्यासाठी दुकानात जातात पण पैसे खर्च न करता तुम्ही घरच्या घरी चष्मा स्वच्छ करू शकता (Photo : Freepik)
-
आज आम्ही तुम्हाला चष्मा स्वच्छ करण्याच्या काही खास टिप्स सांगणार आहोत. अशा आहेत त्या टिप्स (Photo : Freepik)
-
जर तुम्हाला चष्मा स्वच्छ करायचा असेल, तर अर्धा कप डिस्टिल वॉटरमध्ये अर्धा कप ‘विच हेजल’ मिक्स करा. या मिश्रणाला एका स्प्रे बाटलीमध्ये भरा आणि चष्म्याच्या लेन्सवर स्प्रे करा. त्यानंतर मायक्रोफायबर कापडाने लेन्स व्यवस्थित पुसा. तुमचा चष्मा स्वच्छ होईल. (Photo : Freepik)
-
चष्मा स्वच्छ करताना नेहमी काळजी घ्या आणि चुकूनही थंड पाण्याने चष्मा धुऊ नका. अर्धा कप गरम पाण्यामध्ये लिक्विड साबण मिक्स करा. या मिश्रणाला चष्म्याच्या लेन्सवर टाका आणि मऊ कापडाने लेन्स पुसा. (Photo : Freepik)
-
चष्मा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचाही वापर करू शकता. त्यासाठी पाण्यामध्ये व्हिनेगर मिक्स करा आणि हे मिश्रण एक स्प्रे बाटलीत भरा. त्यानंतर लेन्सवर स्प्रे करा. त्यानंतर कॉटन किंवा मायक्रोफायबर कापडाने लेन्स पुसून घ्या. (Photo : Freepik)
-
अल्कोहोलचा वापर करूनही चष्मा स्वच्छ करू शकता. पाण्यात अल्कोहोलचे काही थेंब मिक्स करा. त्यात डिश वॉश लिक्विडचे काही थेंब टाका आणि हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून लेन्सवर स्प्रे करा. त्यानंतर लेन्स मऊ कापडाने पुसा. (Photo : Freepik)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख