-
Haircare: लांबसडक केस कोणाला आवडत नाही. लांब केसांसाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. अनेक महिला मजबूत आणि लांब केसांसाठी शाम्पू, कंडिशनर आणि तेल वापरतात. केसांसाठी खोबरेल तेलाचा वापर प्रामुख्याने होतो. (Photo: Freepik)
-
आपली आजी किंवा आई आपल्याला केसांना तेल लावत असतं. लहानपणापासूनच आपल्यापैकी बहुतेकांना असं सांगितलं जातं की, केसांना नियमितपणे तेल लावल्याने केसांची वाढ होते. हीच परंपरा तुम्हीदेखील पुढे चालवत असाल. (Photo: Freepik)
-
केसांना तेल लावणे ही गोष्ट खूप चांगली आहे, मात्र वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे. जर तुम्हीही केसांना रात्रभर तेल लावत असाल तर त्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.(Photo: Freepik)
-
तेल फक्त केसांना ओलावा आणि धुळीपासून संरक्षण करते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या केसांचे संरक्षण करू शकते. मात्र, केसांची वाढ होण्यामागे तेलाची काहीही भूमिका नसते.(Photo: Freepik)
-
केसांच्या वाढीसाठी विशेषत: व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी, बायोटिन आणि ओमेगा -३ फॅटी ॲसिडची आवश्यकता असते.(Photo: Freepik)
-
रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने आणखी काही फायदा होत नाही. या गोष्टीमुळे डोक्यातील कोंडा वाढू शकतो. (Photo: Freepik)
-
तुम्हाला जर केसांना चमक आणण्यासाठी तेल लावायचं असेल तर केसांच्या लांबीला तेल लावा. केसांच्या मुळांना तेल लावून मसाज करू नका.(Photo: Freepik)
-
त्यामुळे दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ तेल केसांना लावून ठेवू नका. तेल लावल्यानंतर केस धुणे आवश्यक असते. (Photo: Freepik)
-
आठवड्यातून दोनदा असे तेल केसांना लावा, केसांची वाढ चांगली होईल आणि केस निरोगी राहतील.(Photo: Freepik)

Tanisha Bhise Death Case : “होय डॉक्टरांनी डिपॉझिट मागितले होते”, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाची कबुली; म्हणाले, “त्या दिवशी…”