-
आपली त्वचा मुलायम आणि उजळ असावी अशी जवळपास सर्वच महिलांची इच्छा असते. त्यामुळे अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो. पण, कधी कधी ही सौंदर्य प्रसाधने चेहऱ्याला सूट होत नाहीत. तेव्हा सौंदर्य प्रसाधनांपेक्षा त्वचेसाठी गुलाबपाण्याचा वापर करावा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
गुलाबपाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे त्वचेला पोषण तर देतेच पण, त्वचा हायड्रेट, मॉइश्चरायझ करण्यासही मदत करते. जर तुम्ही पुढीलप्रमाणे चेहऱ्यासाठी गुलाबपाण्याचा उपयोग कराल तर तुमच्या त्वचेवर दिवसभर नैसर्गिक तेज दिसेल (फोटो सौजन्य: @Freepik )
-
फेस मास्क – तुम्ही मुलतानी माती, बेसन किंवा दहीमध्ये गुलाबपाणी मिसळून फेस मास्क बनवू शकता. १५ ते २० मिनिटे हे चेहऱ्यावर लावा आणि नंतर पाण्याने धुवा. हे त्वचेला पोषण तर देईलचं पण, मुरुम (पिंपल्स) कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
टोनर – बहुतेक लोक स्किन टोनर वापरत नाहीत. पण, टोनरमुळे तुमच्या चेहऱ्यावरील घाण निघून जाते. तर टोनर म्हणून गुलाबपाणी सुद्धा वापरू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
क्लिंजर – गुलाब पाण्यात कापसाचा गोळा भिजवा आणि हलक्या हाताने चेहरा स्वच्छ करा. हे चेहऱ्यावरील घाण, तेल आणि मेकअप काढण्यास मदत करेल.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
मॉइश्चरायझर – चेहऱ्यावर गुलाबपाणी स्प्रे करा आणि हलक्या हाताने चेहऱ्याने पसरवून घ्या. हे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास आणि मॉइश्चरायझ करण्यात मदत होईल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
गुलाब पाण्यात भिजवलेला कापसाचा तुकडा डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांची सूज आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावर गुलाबपाणी स्प्रे करा. हे मेकअप सेट करण्यात आणि अधिक काळ टिकण्यास मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik )

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…