-
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व हे वेगवेगळे असते. अनेकदा व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व सहज ओळखता येत नाही पण तुम्ही केसांच्या रंगावरून माणसाचा स्वभाव ओळखू शकता. (Photo : Freepik)
-
केस हे माणसाच्या सौदर्यांचा एक अविभाज्य भाग आहे. तुम्ही केसांचे सरळ, कुरळे आणि पिळाकार असे प्रकार बघितले असतील. याचबरोबर अनेक लोकांच्या केसांचे रंग सुद्धा वेगवेगळे असतात. (Photo : Freepik)
-
केसांच्या रंगावरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. आज आपण त्याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
केसांचा रंग आणि व्यक्तिमत्त्वाचा संबंध असू शकतो. केसांचा रंग आणि व्यक्तिमत्त्व यांच्यातील संबंधाविषयी तुम्ही कधी विचार केला आहे का? नुकत्याच एका संशोधनात याविषयी सांगितले आहे. (Photo : Freepik)
-
तुमच्या केसांच्या रंगावरून तुम्ही वैयक्तिक आयुष्याविषयी, स्वभाव आणि व्यक्तीच्या नकारात्मक गोष्टींविषयी जाणून घेऊ शकता. (Photo : Freepik)
-
सोनेरी रंगाचे केस (Blonde Hair Color Personality)
हे लोक खूप मनमिळावू असतात. सोनेरी केसांचा रंग व्यक्तीच्या निरागपणाविषयी सांगतो. असे लोक आशावादी असतात ते नेहमी सकात्मक दृष्टिकोनातून जगाकडे बघतात. ते नेहमी उत्साही असतात आणि त्यांना नवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडते. या लोकांना बोलायला फार आवडते. ते नेहमी विक्री किंवा मार्केटिंगच्या क्षेत्रात आपले करिअर निवडतात. सोनेरी केस असलेले लोकं नात्यातील संवादाला खूप महत्त्व देतात. त्यामुळे यांचे जोडीदाराबरोबर घनिष्ठ संबंध असतात. (Photo : Freepik) -
तपकिरी रंगाचे केस (Red Hair Color Personality)
तपकिरी केसांचा रंग असलेले लोक सहसा इतरांपेक्षा वेगळे असतात. ते चारचौघात व्यक्त व्हायरला घाबरत नाही. ज्या लोकांच्या केसांचा रंग तपकिरी असतो ते लोक साहसी म्हणून ओळखले जातात.ते कलाकार सुद्धा असू शकतात. त्यांना नवीन गोष्टीचा शोध घेण्याची आणि प्रवासाची आवड असते. हे लोक तीव्र स्वभावाचे असतात. ते कला, माध्यम क्षेत्रांशी संबंधीत करिअर निवडू शकतात. (Photo : Freepik) -
क्वचित लाल रंगाचे केस (Brown Hair Color Personality)
क्वचित लाल रंगाचे केस असलेले लोक विश्वसार्ह मानले जाते. अशा लोकांमध्ये खूप स्थिरता असते. ते खूप व्यावहारिक आणि मेहनती असतात. ते कोणतेही काम मन लावू करतात.त्यामुळे त्यांना खूप लवकर यश मिळते. यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि मनमिळावू असतो. कोणत्याही आव्हानांचा ते सहज सामना करतात हे लोक वित्त कायद्याशी संबंधित क्षेत्रातील करिअर निवडू शकतात. नातेसंबंधामध्ये हे लोक विश्वसार्हतेला अधिक महत्त्व देतात. ते नेहमी प्रामाणिक राहतात ज्यामुळे दीर्घकालीन नाते संबंध टिकवून ठेवणे त्यांना सोपी जाते. (Photo : Freepik) -
काळ्या रंगाचे केस (Black Hair Color Personality)
काळ्या केसांचा रंग असलेले लोक खूप जास्त आत्मविश्वासू आणि मजबूत व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखले जातात. ते आव्हानांना घाबरत नाही. काळे केस असलेले लोक इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात. ते विचारांनी स्वतंत्र असतात. त्यांच्यामध्ये लीडरशिप गुण असतो. या लोकांमध्ये सुसंस्कृतपणा आढळतो. यांना स्टायलिश आणि फॅशनेबल राहायला आवडते.हे लोक आत्मविश्वासू आणि स्वतंत्र असतात, जे त्यांच्या करिअरमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार राहतात. त्यांना उद्योजक व्हायला किंवा नेतृत्व सांभाळायला आवडते. (Photo : Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”