-
आपण आपल्या त्वचेची जितकी काळजी घेतो तितकीच केसांची काळजी घेतली पाहिजे. केसांना निरोगी बनवायचे असेल तर त्यासाठी घाम येण्यापासून वाचवणे, त्यांना नीट तेल लावणे सर्वात महत्वाचे आहे. (Photo: Freepik)
-
त्यामुळे केस गळण्याची समस्या कमी करता येईल. नियमित काळजी घेतली तर केस मजबूत आणि सुंदर होऊ शकतात. (Photo: Freepik)
-
केस बांधल्यावर की मोकळे सोडल्यावर जास्त तुटतात, असा प्रश्न बऱ्याच महिलांच्या मनात असतो. चला त्याचं उत्तर जाणून घेऊया. (Photo: Freepik)
-
अनेक महिलांना त्यांचे केस मोकळे ठेवायला आवडतात तर काहींना ते बांधून ठेवायला आवडतात. मात्र, केस मोकळे ठेवल्याने तुटण्याची समस्या वाढू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच रात्री झोपताना केस बांधण्याचा केस बांधण्याचा सल्ला दिला जातो. (Photo: Freepik)
-
अनेक महिला अशी तक्रार की रात्री केस मोकळे सोडून झोपल्यानं सकाळी केस खूप तुटतात, तर बांधून झोपलं की कमी तुटतात. (Photo: Freepik)
-
केस बांधून ठेवल्याने ते कमी तुटतात. केस मोकळे ठेवल्यास त्यांचा कोरडेपणा वाढतो. केस मोकळे ठेवून झोपला की त्याचा सगळा ओलावा उशीला लागतो. (Photo: Freepik)
-
रात्री झोपताना केस विंचरु नये असे सांगितले जाते, पण रात्री केस विंचरून झोपल्यानं केसांचं काहीही नुकसान होत नाही. (Photo: Freepik)
-
रात्री झोपताना आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा केसांना तेल लावून मसाज करा. केसांना तेल लावून मसाज केल्याने स्काल्पमध्ये रक्ताभिसरण वाढते. (Photo: Freepik)
-
केसांना मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे ताणही कमी होतो. केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. केस धुतल्यानंतर केस सिल्की आणि शाईन करतील. (Photo: Freepik)

Saudi Arabia Ban Visa : सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी, कारण काय?