-
दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. पोषक आहाराची कमतरता, अपुरी झोप व चुकीची जीवनशैली यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशात आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे मिळणे खूप महत्त्वाचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, २० मिनिटे सूर्यप्रकाश घेणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. (Photo : Freepik) -
त्याविषयी जनरल फिजिशियन व न्युट्रिशन प्रशिक्षक डॉ. निर्मला राजगोपालन सांगतात, ” त्वचेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न होऊ देता आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोका न वाढविता, तुम्ही २० मिनिटे सूर्यप्रकाश घेऊ शकता. जर काही लोक जास्त काळ सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत असतील, तर त्यांना त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला दिला जातो.” (Photo : Freepik)
-
तज्ज्ञांच्या मते, “व्हिटॅमिन डी देणारा सूर्यप्रकाश चांगली झोप, चांगली त्वचा आणि स्नायू, उत्तम रोगप्रतिकारशक्ती, निरोगी आतडे व मूड सुधारण्यास मदत करते.” (Photo : Freepik)
-
दररोज किती प्रमाणात किती सूर्यप्रकाश घ्यावा हे व्यक्तीच्या त्वचेचा प्रकार, भौगोलिक ठिकाण आणि एकूणच व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असते.
गुरुग्राम येथील मेरेंगो आशिया हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. एम. के. सिंह सांगतात, “दिवसातून १० ते ३० मिनिटे सूर्यप्रकाश घेतला तरी मोठ्या प्रमाणात आपल्याला व्हिटॅमिन डी मिळू शकते. हाडांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी व्हिटॅमिन डीची गरज भासते.” (Photo : Freepik) -
आपल्याला हे लक्षात घेण्याची गरज आहे की, ज्या ठिकाणी दररोज १२ तास सूर्यप्रकाश मिळतो, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी २० मिनिटे सूर्यप्रकाश घ्यावा. “ज्यांच्या त्वचेचा रंग डार्क म्हणजे काळसर असतो त्यांना दिवसातून ३० मिनिटे सूर्यप्रकाश घेण्याची गरज असते. (Photo : Freepik)
-
काळसर त्वचा असणाऱ्या लोकांच्या शरीरात त्वचेचा रंग धारण करणारे मेलॅनिन नावाचे एक रंगद्रव्य अधिक प्रमाणात असते ज्यामुळे त्वचा सूर्यप्रकाश शोषून घेण्यास वेळ घेते,” डॉ. राजगोपालन सांगतात. (Photo : Freepik)
-
डॉ. निर्मला राजगोपालन पुढे सांगतात, “जे लोकं थंड प्रदेशात राहतात, त्यांना सूर्यप्रकाशाची जास्त आवश्यकता असते. अशा लोकांनी ड जीवनसत्त्व मिळविण्यासाठी दररोज दोन तास सूर्यप्रकाशात राहणे आवश्यक आहे.” (Photo : Freepik)
-
सदृढ जीवनशैलीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे. “झोप आणि आतड्यांच्या आरोग्याचा थेट संबंध आहे. जर चांगली झोप झाली असेल, तर आतड्यांचे आरोग्यसुद्धा चांगले राहते. आतड्यांच्या आरोग्याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकार शक्ती आणि मूडवर होतो,” असे डॉ. राजगोपालन सांगतात. (Photo : Freepik)
-
डॉ. एम. के. सिंह सांगतात, “खूप जास्त वेळ सू्र्यप्रकाशात राहिल्यामुळे त्वचेशी संबंधित आजार किंवा त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.” त्या पुढे सांगतात, “सूर्यप्रकाश घेताना योग्य समतोल राखणे गरजेचे आहे. सूर्यप्रकाश घेताना त्वचेच्या संरक्षणासाठी नीट कपडे घातले आणि त्वचेवर सनस्क्रीन वापरले, तर सूर्यप्रकाशाचे फायदे मिळू शकतात. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही तुमच्या शरीरासाठी किती सूर्यप्रकाश आवश्यक आहे, हे जाणून घेऊ शकता.” (Photo : Freepik)
Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण