-
केसांना रंग (कलर) लावणे आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. प्रत्येक जण स्वतःचे केस विविध रंगाने पार्लरमध्ये जाऊन रंगवून घेतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पण, केसांना रंग लावल्यामुळे केस रुक्ष होणे, कोंडा होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
केसांना रंग दिल्यानंतर काही दिवसांत त्यांचा रंग उतरून जातो किंवा केस रफ (रुक्ष) दिसू लागतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर या सगळ्यावर उपाय म्हणून तुम्ही पुढीलप्रमाणे केसांची काळजी घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
हेअर मास्क लावा: आठवड्यातून दोनदा हेअर मास्क लावा ; ज्यामुळे रंग दिलेल्या केसांचे नुकसान (डॅमेज) होणार नाही . केसांना पोषण मिळेल व चमक येईल.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
तेल लावा: केसांच्या रंगांमध्ये विविध रसायने असू शकतात ; ज्यामुळे केसांना नुकसान होऊ शकते किंवा ते कोरडे होऊ शकतात. त्यामुळे नियमितपणे केसांना तेल लावा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
हेअर स्ट्रेटनर, कर्ल्स आदी उत्पादनांचा जास्त वापर करू नका. कारण – यामुळे केस ठिसूळ आणि कोरडे होऊ शकतात आणि केसांचे नुकसान होऊ शकते.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
केसांना राग दिल्यानंतर केस सतत केस धुणे टाळा. या गोष्टीमुळे केसांचा रंग लवकर निघून जाण्याची शक्यता असते. तसेच यामुळे केसांचे नैसर्गिक तेल कमी होते आणि केस खूप कोरडे दिसू लागतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
नियमितपणे केस कापा : केसांना रंगवल्याने तुमचे केस कमकुवत होऊ शकतात आणि तुटणे, फाटे फुटणे आदी समस्या निर्माण येऊ शकतात. तुमचे केसांना फाटे फुटू नये म्हणून ते नियमितपणे कापणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )

पैसाच पैसा! ४८ तासांनंतर या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार, प्रगती होण्याचा योग