-
दूध आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि अनेक प्रकारची खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीराला पोषण मिळते. (Photo: Freepik)
-
दूध प्यायल्याने शरीर मजबूत होते, पण तुम्हाला माहित आहे का की दूध उकळताना आपण काही चुका करतो, ज्या अजिबात करू नये. (Photo: Freepik)
-
दूध किती वेळा उकळावे हे तुम्हालाही माहिती नसेल तर जाणून घ्या. (Photo: Freepik)
-
आपण दुध उकळताना अशा काही चुका करतो ज्यामुळे शरीराला दुधाचा पुरेपूर फायदा मिळत नाही आणि अनेक वेळा दूध उकळावे लागते. होय, बरेच लोक दूध घट्ट करण्यासाठी बराच वेळ उकळतात. (Photo: Freepik)
-
इतकेच नाही तर काही लोक दूध उकळू लागल्यावर गॅस कमी करतात आणि बराच वेळ उकळत ठेवतात. चला जाणून घेऊया दूध उकळण्याची योग्य पद्धत कोणती आहे. (Photo: Freepik)
-
अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, दूध जास्त वेळ उकळल्याने किंवा वारंवार उकळल्याने पोषक तत्वांचा नाश होतो. यामुळे शरीराला दुधाचे सर्व फायदे मिळत नाहीत.(Photo: Freepik)
-
दूध एकदाच उकळून पहा. जर असे वाटत असेल की दूध खराब होईल तर तुम्ही ते आणखी एकदा उकळू शकता. (Photo: Freepik)
-
जेवल्यानंतर दूध प्यायची सवय असेल तर दूध हे योग्य प्रमाणातच प्या जास्त पिऊ नका. अन्यथा पचन बिघडू शकते. (Photo: Freepik)
-
जेवणानंतर लगेच दूध पिऊ नये. यामुळे पोटात जडपणा आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. दुधासोबत खारट पदार्थ खाणे टाळावे. (Photo: Freepik)
मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल समोर आलेले फोटो…”