-
Morning or Evening, Perfect Time For Walk: उन्हाळ्यात सकाळच्या वेळी पण उन्हाचे चटके लागतात अशावेळी व्यायाम करणं म्हणजे अगदीच नकोसं वाटतं. पण म्हणून तुम्ही व्यायाम अजिबात बंद करू नका किंवा आज करू उद्या करू म्हणून पुढेही ढकलू नका
-
खरंतर, आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार जर आपण चालण्याची वेळ योग्य निवडली तर त्याचा आणखी फायदा होऊ शकतो. प्रश्न योग्य वेळेचा असल्याने नेमकं सकाळच्या वेळी चालावं की संध्याकाळी हा प्रश्न अनेक वर्षे वादात आहे आज आपण तज्ज्ञांकडून या प्रश्नांचे उत्तर जाणून घेणार आहोत
-
इंडियन एक्सस्प्रेसने कोलंबिया पॅसिफिक कम्युनिटीजचे तंदुरुस्ती आणि आरोग्य प्रमुख, डॉ कार्तियायिनी यांच्या हवाल्याने सांगितले की, आपले शरीर सर्केडियन रिदमनुसार कार्य करते, दुपारी २. ३० नंतर कोणत्याही हालचालीसाठी स्नायूंची अधिक ताकद आवश्यक असते. तेव्हा आपले शरीर सर्वोत्तम समन्वयात असते व उत्तम प्रतिसाद देते
-
दुसरीकडे, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कार्यक्षमता आणि स्नायूंची ताकद सर्वाधिक असते. त्यामुळे आपले शरीर संध्याकाळी चालण्यासाठी अधिक सक्षम असते
-
पण अन्य महत्त्वाची बाब अशी की संध्याकाळच्या वेळी हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण अधिक असू शकते. त्या तुलनेने रात्रीच्या वेळी प्रदूषित हवा स्थिरावते व पहाटे प्रदूषणाचे प्रमाण त्यामुळेच कमी असते. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता, सकाळी चालणे हे अधिक फायदेशीर असू शकते
-
तसेच चालताना काही गोष्टी लक्षात ठेवणेसुद्धा आवश्यक आहे. जसे की, शक्य असेल तेव्हा, अनवाणी चालणे निवडावे. यामुळे वृद्ध व लहान मुलांमध्ये संवेदना सक्रिय होतात. शरीराची कमान व पोश्चर नीट विकसित होण्यासाठी सुद्धा याची मदत होते. अनवाणी चालल्याने पायातील गुरुत्वाकर्षण सेन्सर ऍक्टिव्ह होऊन संतुलित वाढीस प्रोत्साहन देतात.
-
डॉ कार्तियायिनी सांगतात की, चालण्याच्या बाबत वय हा एक महत्त्वाचा निकष आहे, वयानुरूप होणारे आजार हे चालण्यावर बंधने आणू शकतात.
-
उदाहरणार्थ, एखाद्याला उच्च रक्तदाब (बीपी) असल्यास, पहाटेच्या वेळेस बीपीमध्ये शारीरिक वाढ होते, त्यामुळे व्यक्तीने पहाटे खूप लवकर चालू नये, विशेषत: जर त्यांचे बीपी नियंत्रित होत नसेल तर सकाळी थोडे उशिराने चालणे निवडावे
-
कामामुळे आपल्याला सकाळी चालणे अगदीच शक्य होत नसेल तर ‘ड’ जीवनसत्त्वाचा सर्वाधिक फायदेशीर डोस मिळविण्यासाठी संध्याकाळी ४.०० ते ४.३० वाजेच्या सुमारास चालणे निवडावे.(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण