-
चटपटीत आंबट-गोड आणि लाल रंगाची मसाला कैरी आपल्यापैकी अनेकांनी खाल्ली असेल. अशी कैरी विशेषतः शाळेच्या बाहेर जे चिंचा-बोरं विकण्यासाठी बसायचे त्यांच्याकडे हमखास मिळायची. या मस्त चटकदार कैरीचे नुसते नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. आता हळूहळू बाजारात कैऱ्या दिसू लागल्या आहेत. तसेच वाळवण घालण्यासाठीदेखील योग्य वातावरण आहे. [photo credit : Freepik]
-
चला तर मग, आज हीच आपल्या शाळेच्या दिवसांची आणि बालपणाची आठवण करून देणारी मसाला कैरी कशी बनवायची तसेच त्यांचे योग्य प्रमाण काय आहे ते बघून, लगेच बनवून पाहा. [photo credit : Freepik]
-
साहित्य – कैरी, लाल तिखट, जिरे पावडर, हळद, मिरपूड, काळे मीठ, पिठी साखर [photo credit : Freepik]
-
कृती – सर्वप्रथम अर्धा किलो गावरान कैरी स्वच्छ धुवून, कैऱ्यांची सालं सोलाण्याने सोलून घ्या. सर्व कैऱ्यांच्या लहान आकाराच्या पातळ आणि बारीक फोडी करून घ्या. [photo credit : Freepik]
-
आता या सर्व पातळ फोडींना एका परातीमध्ये घेऊन, त्यावर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरपूड, एक चमचा जिरेपूड घालून घ्यावी. त्याचबरोबर, अर्धा चमचा काळे मीठ, अर्धा चमचा साधे मीठ आणि तीन चमचे पिठीसाखर घालून घ्यावी. [photo credit : Freepik]
-
सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर कैरीच्या सर्व फोडी हाताने मसाल्यांमध्ये मिसळून घ्या. आता या कैरीचे वाळवण घालण्यासाठी, परातीमधील कैरीची एकेक फोड दुसऱ्या ताटामध्ये पासून घ्या. ताटातील कैरीच्या फोडी एकमेकींना चिकटणार नाही याची काळजी घ्या. चटपटीत मसाला कैरी रेसिपी – [photo credit : Freepik]
-
फोडी एकमेकींना चिकटल्यास त्यांना पाणी सुटेल तसेच वाळवण वळण्यासाठी वेळ लागेल. आता मालास कैरीचे हे वाळवण दोन दिवस कडक उन्हात वाळवून घ्या. सर्व कैऱ्या व्यवस्थित वाळल्यानंतर त्यांना एखाद्या बरणीत साठवून ठेवा. चटपटीत मसाला कैरी रेसिपी – [photo credit : Freepik]
-
वाळवण साठवण्यासाठी आधी बरणी स्वच्छ धुवून, कोरडी करावी. त्यानंतर यात मसाला कैरी भरून झाकण घट्ट बंद करून घ्या. तयार आहे आपली आंबट-गोड आणि चटपटीत अशी मसाला कैरी. चटपटीत मसाला कैरी रेसिपी – [photo credit : Freepik]
-
महत्त्वाची टीप- कैरीच्या फोडी मसाला लावायच्या आधी कोरड्या असाव्या. वाळवण घालताना कैरीच्या फोडींमध्ये अंतर असणे गरजेचे आहे. वाळवण भरताना कैरीच्या फोडी कोरड्या असाव्या. नाहीतर तयार पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. चटपटीत मसाला कैरी रेसिपी – [photo credit : Freepik]

Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल