-
खास प्रसंगी बहुतेक स्त्रिया हातपाय सुंदर दिसावेत म्हणून मेनिक्युअर आणि पेडिक्युअर करून घेतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पण, पार्लरमध्ये यासाठी बराच वेळ लागतो आणि पैसेही खर्च होतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पेडिक्युअर केल्यामुळे पायावर जमा झालेली मृत त्वचा निघून जाते, फाटलेल्या टाचा दुरुस्त होतात आणि पायांची चमकही वाढते. तसेच पेडिक्युअर करताना पायांना मसाज केला जातो ; त्यामुळे शरीराला आराम मिळतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर अशावेळी तुम्ही घरच्या घरी सुद्धा पार्लरसारखे पेडिक्युअर करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
सगळ्यात पहिल्या नखांवर लावलेली नेलपेंट रिमूव्हरच्या मदतीने पुसून घ्या. त्यानंतर तुमच्या नेलकटरच्या सहाय्याने तुम्हाला आवडतील अशा आकारामध्ये नखे कापून घ्या आणि त्यांना शेप द्या. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
यानंतर एका टबमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात लिंबाचे तुकडे आणि मीठ टाका. तुमचे पाय त्यात १० ते १५ मिनिटे ठेवा. पायांची त्वचा मऊ झाल्यावर नखे ब्रशने स्वच्छ करा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
मसाज करा : स्क्रब केल्यानंतर पायांना टॉवेलने पुसून घ्या. त्यानंतर मॉइश्चरायझर किंवा नारळाचे तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
स्क्रब करा : एक चमचा लिंबाचा रस, दोन चमचे साखर आणि अर्धा चमचा खोबरेल तेल घ्या आणि पाय घासून घ्या. टाचा स्वच्छ करण्यासाठी प्युमिस स्टोन वापरा आणि सर्व मृत त्वचा काढून टाका. काही वेळ स्क्रब केल्यानंतर पुन्हा कोमट पाण्याने पाय स्वच्छ करा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
नेलपेंट लावा : नंतर नखांना बेस कोट लावा आणि मग तुमच्या आवडीची नेलपॉलिश लावा आणि नंतर दुसरा कोट लावा. यामुळे नखे अधिक आकर्षक दिसतील. (फोटो सौजन्य: @Freepik )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”