-
प्रत्येकाला वाटतं की, आपली त्वचा स्वछ, मऊ आणि चमकदार असावी. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पण, धावपळीच्या जीवनात वेळ मिळत नाही आणि त्वचेकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
काही जण कंटाळा करून फ्रेश न होता असेच झोपून जातात आणि मग चेहऱ्यावर मुरुम येतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर यावर उपाय म्हणून तुम्ही पुढीलप्रमाणे झोपण्यापूर्वी चेहऱ्याची अशी काळजी घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या : तुमची त्वचा दिवसभर धूळ आणि प्रदूषणाच्या संपर्कात राहते. त्यामुळे त्वचेची छिद्रे ब्लॉक होतात. त्यामुळे रात्री चेहरा धुवून झोपावे. यामुळे अनेक समस्या दूर होतात आणि चेहरा सुद्धा फ्रेश दिसतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करा: तुमची त्वचा रात्रीच्या वेळी हायड्रेटेड ठेवणे गरजेचं आहे. मॉइश्चरायझर त्वचेची आर्द्रता लॉक करण्यास मदत करते. त्यामुळे चेहऱ्यावरील ओलावा टिकून राहतो. म्हणून रात्री चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
डोळ्यांखाली क्रीम लावा : डोळ्यांखाली काळे वर्तुळ तयार झाल्यास सौंदर्य कमी होऊ शकते. डोळ्यांखालील भाग सुद्धा मॉइश्चराइझ करणे आवश्यक आहे. कारण – तुमच्या डोळ्यांखालील त्वचा अत्यंत नाजूक असते. तुम्ही आर्गॉन तेल, कोरफड जेल किंवा आय-क्रीम सुद्धा डोळ्यांखाली लावू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
झोपण्यापूर्वी काही तास आधी पाणी प्या: झोपण्याच्या काही तास आधी पाणी प्या. कारण ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत तर करतेच आणि त्वचाही चमकदार होते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
सॅटिन किंवा सिल्क कापडाच्या उशी वापरा : झोपायच्या आधी लावलेली स्किनकेअर उत्पादने फॅब्रिक शोषत नाहीत. त्यामुळे सॅटिन किंवा सिल्क कापडाच्या उशी वापरा. (फोटो सौजन्य: @Freepik )

पुणेकरांनो पाणीपुरी खाताना सावधान! बाहेरील टेस्टी पाणीपुरी खाण्याअगोदर हा VIDEO पाहाच; पाहून पायाखालची जमीन सरकेल