-
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो. या ग्रहांचा सर्व बारा राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो.
-
वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला व्यापार, बुद्धिमत्ता, तर्क, अर्थव्यवस्था, वाणी आणि संवादाचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो.
-
ग्रहांचा राजकुमार अशी ओळख असलेला बुध ग्रह लवकरच आपलं राशी स्थान बदलणार आहे. २६ मार्च रोजी बुध हा मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे.
-
बुधदेवाच्या राशी बदलामुळे काही राशींना व्यापारात मोठा धनलाभ, करिअरमध्ये यश आणि जीवनात सुख लाभण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
-
बुधाचे राशी परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. कारण बुधदेव तुमच्याच राशीत गोचर करणार आहेत. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे
-
बुधदेवाचे राशी बदल मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरु शकते.तुम्हाला मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. व्यापारी वर्गाला यावेळी चांगला लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात.
-
बुधदेवाचे गोचर मीन राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. बेरोजगारांना नोकरीची उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे.आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.
-
(टीप-वरील माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…