-
ज्योतिषशास्त्रानुसार, धैर्य, शौर्य, पराक्रम, जमीन आणि लग्नाचा कारक मंगळ ग्रह लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. मंगळदेव कुंभ राशीत गोचर करणार आहेत.
-
१५ मार्चला मंगळदेव गोचर करणार आहेत. त्यामुळे काही राशींना शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. तुमची रास यात आहे का, जाणून घ्या…
-
मंगळ गोचरमुळे मेष राशीच्या लोकांचे अच्छे दिन येऊ शकतात. या लोकांना करिअरमध्ये यश संपादन करता येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. अडकलेली कामं सहज मार्गी लागू शकतात.
-
प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. घरात शुभ कार्य होऊ शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.
-
ग्रहांचा सेनापती मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे सिंह राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
-
यावेळी तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. तुमच्या योजना या काळात यशस्वी होऊ शकतात.
-
मंगळाचा गोचर कुंभ राशीसाठी फायदेशीर ठरु शकतो. तुम्हाला व्यवसायातून मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. हा काळ गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरु शकतो. शेअर बाजार, सट्टाबाजी आणि लॉटरीतून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे.
-
सुख, समृद्धी आणि कीर्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमवू शकतात. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
-
(टीप-वरील माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे) (फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश