-
शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा असतो. त्वचा गोरी असो किंवा सावळी काही वेळा हाताच्या कोपऱ्यांवरील व गुडघ्यावरील त्वचा काळी दिसते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
हे सर्व फक्त अस्वच्छतेमुळे नाही तर या भागात मृत पेशी साठल्याने हा भाग निश्तेज दिसत असतो. यासाठी आपण अनेक ब्युटी प्रोडक्टचा सुद्धा वापर करतो. पण, त्याचा काही उपयोग होत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर तुम्ही कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा कमी करण्यासाठी पुढीलप्रमाणे काही घरगुती उपाय करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
लिंबू : लिंबू हे एक नैसर्गिक ब्लीच आहे; जे त्वचेला उजळ करण्यास मदत करते. लिंबाचा रस कोपर आणि गुडघ्यावर लावल्याने काळे डाग कमी होतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
हळद : हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात ; जे त्वचेवरील घाण काढून टाकण्यास मदत करतात. यासाठी दूध किंवा दह्यात हळद पावडर मिसळून पेस्ट बनवा आणि कोपर आणि गुडघ्यावर लावा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
दही : दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते ; जे त्वचा उजळ करण्यास मदत करते. दही १५ ते २० मिनिटे कोपर आणि गुडघ्यावर लावा व नंतर धुवून टाका. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
बेकिंग सोडा : बेकिंग सोडा त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतो. बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा आणि कोपर आणि गुडघ्यावर लावा असे करणे फायदेशीर ठरू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
काकडी : काकडीत अनेक घटक असतात ; जे त्वचेचा रंग सुधरण्यास मदत करतात. काकडीचे तुकडे करून घ्या आणि १५ मिनिट कोपर आणि गुडघ्यांवर घासून घ्या. नंतर पाच मिनिटे असंच ठेवा आणि मग थंड पाण्याने धुवून घ्या. असे रोज केल्याने कोपर आणि गुडघ्यांवर काळे डाग कमी होऊ शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
नारळाचे तेल : खोबरेल तेल त्वचेला मॉइश्चराइझ आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. नारळाच्या तेल कोपर आणि गुडघ्यांवर नियमितपणे लावल्याने काळे डाग कमी होऊ शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”