-
आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या बटाट्याचा वापर तुम्ही तुमच्या केस आणि त्वचेसाठीदेखील करू शकता. डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे, चेहऱ्यावरचा काळपटपणा,केसांची चमक नाहीशी होणे आणि केस गळू लागणे या सर्व समस्यांवर अतिशय सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे बटाटा. @click4su या इन्स्टाग्राम अकाउंटने बटाट्याचा उपयोग चेहरा आणि केसांसाठी कसा करायचा हे सांगितलं आहे. काय आहेत या ६ टिप्स पाहा. [Photo credit – Freepik]
-
१. डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी
बटाटा सोलून त्याच्या चकत्या कापून घ्या.
काहीवेळासाठी या चकत्या फ्रिजमध्ये ठेऊन, नंतर आपल्या डोळ्यांवर ठेवावे.
यामुळे नैसर्गिकरित्या डोळ्याखालील काळी वर्तुळे जाऊन, डोळ्यावरील सूज कमी करण्यास मदत होते.
[Photo credit – Freepik] -
२. केसांचे गळणे कमी करण्यासाठी
बटाट्याचा रस आणि कोरफडीचा गर व्यवस्थित एकत्र करून घ्या.
आता हे मिश्रण आपल्या केसांच्या मुळाशी लावून डोक्याला मसाज करावा.
नंतर केस कंगव्याने शेवटपर्यंत व्यवस्थित विंचरून घ्यावे.
[Photo credit – Freepik] -
३. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी
बटाट्याचा रस आणि मध व्यवस्थित एकत्र करून त्याचे एक मिश्रण बनवावे.
हे मिश्रण ब्रशच्या साहाय्याने चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवून नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
[Photo credit – Freepik] -
४. केसांची चमक वाढवण्यासाठी
बटाटा आणि त्याची सालं तासभर पाण्यात उकळून घ्या, आता बटाटे बाजूला काढून त्याचे केवळ पाणी एक भांड्यात काढून घ्या.
हे पाणी गार झाल्यानंरतर, याने तुमचे केस धुवून घ्या. यामुळे केसांना चमक येण्यास मदत होईल.
[Photo credit – Freepik] -
५. त्वचा उजळवण्यासाठी
एखादा टिशू पेपर बटाट्याच्या रसामध्ये भिजवून आपल्या चेहऱ्यावर काही मिनिटांसाठी लावून ठेवावा.
यामुळे चेहऱ्याला आराम मिळून, त्वचा उजळण्यास मदत होऊ शकते.
[Photo credit – Freepik] -
६. त्वचेवरील मुरुमं घालवण्यासाठी
चेहऱ्यावरील मुरुमं घालवण्यासाठी, कान साफ करण्याची क्यू-टीप [कापसाचे इयरबड्स] बटाट्याच्या रसात बुडवून थेट मुरुमांवर लावावे.
किंवा चेहऱ्याला टोनर लावता त्याप्रमाणे सर्व चेहऱ्यावर बटाट्याचा रस कापसाने लावू शकता.
[Photo credit – Freepik]
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख