-
वेगवेगळ्या रंगांमध्ये न्हाऊन निघण्याचा दिवस म्हणजे धूलिवंदन. केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक भागांमध्ये हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. (Pexels)
-
कोणत्याही जाती-धर्माचे, रंग-वर्णचे बंधन न पाळता लोकं आनंदाने होळी खेळतात. (Pexels)
-
होळी हा सण राधा-कृष्ण यांच्या प्रेमाचे प्रतीकही मानले जाते. (Pexels)
-
यंदा सोमवारी 25 मार्चला संपूर्ण देशात धूलिवंदन हा सण साजरा केला जाणार आहे, तर 24 मार्चला होलिका दहन केले जाईल. (Pexels)
-
ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, यावर्षीचे धूलिवंदन खेळायला तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी कोणते रंग शुभ ठरू शकतात, हे जाणून घ्या. (Pexels)
-
मेष राशीच्या लोकांनी यावर्षी लाल रंगाने होळी खेळावी असा सल्ला देण्यात आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी लाल रंग शुभ मानला जातो, तसेच हा रंग प्रेम आणि सत्य या गुणांशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. (Pixabay)
-
यंदाच्या वर्षी वृषभ राशीच्या लोकांनी होळी खेळण्यातही जांभळ्या रंगाची निवड करावी. शुक्राचे अधिपत्य असणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांमध्ये सुरक्षा आणि स्थिरता यासारखी वैशिष्ट्ये असतात. अशा परिस्थितीत जांभळा रंग वाढ, स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. (Pixabay)
-
मिथुन राशीच्या लोकांनी यंदाची होळी साजरी करण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर करावा असा सल्ला देण्यात आला आहे. हिरवा रंग निसर्गाचे प्रतिनिधित्व करतो आणि बुध-शासित मिथुनच्या वैशिष्ट्यांसह चांगले जुळवून घेतो. (Pixabay)
-
या होळीला कर्क राशीच्या लोकांनी निळ्या रंगाची निवड करावी. कर्क राशीवर चंद्राचे अधिपत्य असते. अशातच या लोकांसाठी निळ्या रंगाची निवड शुभ ठरू शकते. (Pixabay)
-
होळी खेळण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी भगवा रंग निवडावा. सूर्याचे अधिपत्य असणाऱ्या सिंह राशीसाठी यंदाच्या होळीला भगवा रंग शुभ मानला गेला आहे. (Pixabay)
-
कन्या राशीच्या लोकांनी होळी खेळण्यासाठी पिवळा रंग निवडावा. कन्या राशीवर बुध राशीचे राज्य असून त्यांनी आपली बहीण आणि काकीला निळा रंग लावण्याचा सल्ला दिला आहे. (Pixabay)
-
यंदाच्या होळीला तूळ राशीच्या लोकांनी निळा आणि केशरी रंगाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Pixabay)
-
वृश्चिक राशीचे लोक होळी खेळण्यासाठी कोणत्याही रंगाची निवड करू शकतात. (Pixabay)
-
धनु राशीच्या लोकांनी यंदाची होळी साजरी करण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करावा असा सल्ला देण्यात आला आहे. (Pixabay)
-
मकर राशीच्या लोकांनी यंदाची होळी लाल, जांभळा आणि तपकिरी रंगाचा वापर करावा असे सांगण्यात येत आहे. (Pixabay)
-
यंदाच्या होळीला कुंभ राशीच्या लोकांनी गडद रंगाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Pixabay)
-
मीन राशीचे लोक हिरवा आणि गुलाबी रंगाने होळी खेळू शकतात. (Pixabay)
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Pexels)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा