-
Holi 2024 रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे…लवकरच रंगांची उधळण करत होळी येणार आहे. रंग खेळायला मज्जा येते मात्र तोच रंग काढताना नाकी नऊ आल्याशिवाय राहत नाही. (Photo: Freepik)
-
याच धाकाने बहुतांश लोक होळीच्या रंगापासून स्वत:ला जपतात. मात्र ”बुरा न मानो होली है,” म्हणून त्यांच्या अंगावर कोणी रंग टाकून जातोच. (Photo: Freepik)
-
स्वतःची इच्छा असूनही फक्त त्वचेची काळजी तुम्हाला आनंद साजरा करण्यापासून थांबवतेय का? तर असे करण्याची काहीच गरज नाही, आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत. (Photo: Freepik)
-
रंग खेळून झाल्यानंतर तो रंग काढायचा कसा? असा प्रश्न आपल्याला पडला असेलच. यासाठी तुमच्यासाठी काही खास टिप्स. (Photo: Freepik)
-
बेसन, लिंबाचा रस आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करा. रंग असलेल्या त्वचेवर ही पेस्ट लावा. १५-२० मिनीट ती पेस्ट सुकू द्या आणि सुकल्यानंतर त्वचा स्वच्छ करा. त्वचा पूर्णपणे स्वच्छ होईल. (Photo: Freepik)
-
होळीचे रंग काढण्याचा हा सर्वात परिणामकारक उपाय आहे. काकडीच्या रसात गुलाबजल आणि एक चमचा साईडर व्हिनेगर घालून मिश्रण तयार करा. रंग असलेल्या त्वचेवर ते लावा आणि काही वेळाने चेहरा धुवा. यामुळे रंग गायब होऊन त्वचा पूर्णपणे स्वच्छ होईल.(Photo: Freepik)
-
होळीचे रंग काढण्यासाठी मुळ्याचा रस अतिशय फायदेशीर आहे. त्यासाठी मुळ्याच्या रसात बेसन आणि दूध मिसळा. त्याची घट्टसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून सुकल्यानंतर चेहरा धुवा. यामुळे रंग निघण्याबरोबरच त्वचा मॉईश्चराईज होईल.(Photo: Freepik)
-
होळीचे रंग काढण्यासाठी तुम्ही हा उपायही करू शकता. यासाठी दुधात कच्च्या पपईचा गर घाला. त्यात मुलतानी माती आणि बदामाचे तेल घालून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावून २० मिनिटांनी चेहार स्वच्छ करा.(Photo: Freepik)
-
जर तुमच्या पांढऱ्या कपड्यांवर रंग लागला असेल तर त्यातील रंग काढणे थोडे कठीण आहे. पांढरे कपडे खूप लवकर रंग शोषून घेतात. जर तुम्हाला पांढऱ्या कपड्यांवरून रंग काढायचा असेल, तर अर्धा कप कोमट पाण्यात नॉन-क्लोरीन ब्लीच घाला आणि मग त्यात तुमचे पांढरे कपडे घाला.(Photo: Freepik)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा