-
खराब लाइफस्टाईलमुळे आजकाल लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढण्याची समस्या दिसून येतेय. कोलेस्ट्रॉल ही गंभीर समस्या बनली आहे. शरीरातील कोलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका निर्माण करू शकते.
-
हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य आणि पोषक आहार महत्त्वाचा असतो.
-
कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच उपायांवर गुडगाव येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट प्रमुख दीप्ती खातुजा यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
-
तज्ज्ञ म्हणतात, “खराब कोलेस्ट्रॉल आपल्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या ब्लॉक होऊ लागतात. अंबाडीच्या बिया (फ्लेक्स सीड्स) सुपरफूड असून, या बियांचे तुम्ही सेवन करू शकता.
-
अंबाडीच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते; ज्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. त्या दीर्घकाळ सेवन करणे सुरक्षित आहे. आयुर्वेदात अंबाडीच्या बिया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या गेल्या आहेत.”
-
पोषणतज्ज्ञ सांगतात, “दररोज एक चमचा किंवा पाच ग्रॅम्सने सुरुवात करा. अभ्यासानुसार दररोज एक चमचा (सात ग्रॅम्स) ग्राउंड फ्लेक्स सीड्समध्ये दोन ग्रॅम फायबर असते. त्याचे फायदेशीर परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे या बिया रामबाण उपाय ठरू शकतात.
-
उच्च रक्तदाब व वजन कमी करण्यासाठी अंबाडीच्या बिया उपयुक्त ठरू शकतात. तसेच या सेवनाने बीएमआय आणि पोटावरील चरबीही कमी होऊ शकते.
-
अंबाडीच्या बियांमुळे LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्याचसोबत चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. म्हणजेच अंबाडीच्या बिया रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात आणण्यास मदत होते.
-
वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या फळांचा आहारात समावेश करू शकता. खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करीत राहून नियमित व्यायामही करीत राहा. (फोटो सौजन्य : freepik)

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा