-
हवेतील उष्णता वाढून, उन्हाळा सुरु झालेला आहे. अशा वातावरणात सूर्य किरणांचा , धूळ, प्रदूषणाचा वाईट परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. मात्र सर्व आपण चेहरा तुकतुकीत ठेवण्यासाठी, उजळ राहण्यासाठी वेगवेगळ्या फेसमास्क, फेसपॅक इत्यादींचा वापर करतो. परंतु आपल्या नाकाकडे मात्र आपण तेवढे लक्ष देत नाही.[Photo credit – Freepik]
-
त्यामुळे धूळ, घाण आपल्या नाकाच्या त्वचेवरील छिद्रांमध्ये जमा होते. परिणामी आपले नाक खरखरीत होते. त्यावर काळ्या रंगाचे बारीक-बारीक ठिपके पाहायला मिळतात. त्यालाच आपण ब्लॅकहेड्स म्हणतो. आता नाकावरचे हे चिवट ब्लॅकहेड्स कसे काढायचे, तत्यासाठी घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करायचा त्याच्या टिप्स इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @click4su नावाच्या अकाउंटने शेअर केल्या आहेत, त्या पाहू.[Photo credit – Freepik]
-
१. चेहऱ्यावर वाफ घेणे
एका पातेल्यात पाणी घेऊन ते उकळून घ्यावे.
पातेल्यातील पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर त्यामध्ये थोडासा कापूर घाला.
आता डोक्यावरून एखादी चादर, स्कार्फ किंवा मोठा रुमाल घेऊन पातेल्यातील पाण्याची वाफ चेहऱ्यावर घ्या.
ही क्रिया २० मिनिटांनंतर पुन्हा एकदा करा.
[Photo credit – Freepik] -
२. बेकिंग सोडा मास्क
एक छोटा चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्या.
दोन्ही गोष्टी एकत्र करून त्याची एक पेस्ट तयार करा.
ही पेस्ट १५ ते २० मिनिटांसाठी नाकावर लावून ठेवा.
नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
[Photo credit – Freepik] -
३. लिंबू, मध आणि साखरेचा मास्क
एक चमचा लिंबाचा रस, १ चमचा मध आणि १ चमचा साखर एका बाउलमध्ये घ्या.
सर्व पदार्थ नीट मिसळून घ्या.
तयार झालेला मास्क किंवा मिश्रण नाकावर एकसमान लावून ठेवा.
३० मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्या.
[Photo credit – Freepik] -
४. ओटमील स्क्रब
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये थोडेसे ओटमील आणि थोडे दूध घालून त्याची पेस्ट बनवून घ्या.
तयार ओटमील स्क्रब संपूर्ण चेहऱ्यावर लावून छान मसाज करा. विशेषतः नाकाला स्क्रब करावा.
चेहऱ्यावर लावलेला ओटमील स्क्रब थोड्यावेळाने पाण्याने धुवून टाका. अथवा तुम्हाला लगेच धुवून टाकला तरी चालेल.
[Photo credit – Freepik] -
घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून हे मास्क बनवून आणि वापरून पाहा. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @click4su नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या या स्किन केअर टिप्स घरगुती असून, वैद्यकीय सल्ला नाही याची नोंद घ्यावी. [Photo credit – Freepik]

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई