-
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर बारीक नजर असते. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करताच राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. मार्च महिना ग्रह-नक्षत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
-
मंगळदेवाने या महिन्यात कुंभ राशीत प्रवेश केला आहे. जिथे आधीपासूनच कुंभ राशीत शुक्र-शनि विराजमान आहेत. त्यामुळे कुंभ राशीत शुक्र-शनि आणि मंगळदेवाची युती होणार आहे.
-
हा दुर्लभ संयोग १४८ वर्षांनी बनत आहे. हा योग काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे.
-
त्यांना आयुष्यात अपार यश, बक्कळ पैसा, मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
शुक्र-शनि आणि मंगळदेवाची युती मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या काळात तुम्हाला करिअर आणि बिझनेसच्या क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना नोकरीत बढतीच्या नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही पैसेही वाचवू शकाल. तुमच्या व्यवसायालाही गती मिळू शकते
-
शुक्र-शनि आणि मंगळदेवाची युती कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. एखादे अडकलेले काम या कालावधीत झटपट पूर्ण होऊ शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. न्यायलयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.
-
शुक्र-शनि आणि मंगळदेवाची युती धनु राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन