-
होळी हा सण संपूर्ण देशात अगदी उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी २५ मार्चला रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. (Photo: Pexels)
-
रंगपंचमीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून या सणाच्या शुभेच्छा देतात. सावधगिरी बाळगून, लोक रंगपंचमीच्या दिवशी त्वचेवर खोबरेल तेल लावून रंगपंचमी खेळतात जेणेकरुन नंतर रंग सहज काढता येईल. (Photo: Pexels)
-
पण रंगपंचमीनंतर फक्त त्वचाच नाही तर नखांचा रंगही काढणे खूप अवघड असते. म्हणूनच रंगपंचमी खेळताना तुमच्या त्वचेप्रमाणे तुमच्या नखांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. (Photo: Pexels)
-
यंदाच्या रंगपंचमीनंतर नखांचा रंग काढण्यासाठी तुम्ही विविध घरगुती उपाय करून पाहू शकता. (Photo: Pexels)
-
व्हिनेगरचा वापर करून तुम्ही नखांवरील रंग काढून टाकू शकता. यासाठी एका वाटीमध्ये ३-४ चमचे व्हिनेगर घ्यावा. यामध्ये काही वेळ आपली नखे बुडवून ठेवावी. यानंतर कापसाचा वापर करून रंग निघेपर्यंत नखे घासावी. (Photo: Freepik)
-
विविध पदार्थ तयार करण्यासाठी आमचूर पावडर वापरली जाते. याचा वापर तुम्ही नखांचा रंग काढण्यासाठीही करू शकता. (Photo: Freepik)
-
एका भांड्यात अर्धा चमचा आमचूर पावडर घ्या. त्यात २-३ थेंब पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा. ते चांगले मिसळा. ब्रश वापरून नखे स्वच्छ करा. हे नखांचा रंग काढण्यास मदत करेल. (Photo: Freepik)
-
रंगपंचमीच्या आदल्या रात्री नखे तेलाने स्वच्छ धुवा. त्यानंतर सर्व नखांवर पारदर्शक नेलपॉलिशचा डबल कोट लावा. रंग खेळल्यानंतर, नेलपेंट रीमूव्हर वापरून नेल पॉलिशचा कोट काढा. (Photo: Freepik)
-
लिंबाचे अनेक फायदे आहेत. हे वजन कमी करण्यापासून हट्टी डाग काढण्यापर्यंत अनेक कामांमध्ये आपली मदत करते. याचा वापर तुम्ही नखांचा रंग काढण्यासाठीही करू शकता. (Photo: Freepik)
-
यासाठी १ लिंबू घ्या. त्याचा सर्व रस पिळून घ्या. एक क्यू-टिप घ्या. लिंबाच्या रसात बुडवून ठेवा. नखे स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करा. (Photo: Freepik)
-
जर तुमच्या नखांवर अजूनही रंग कायम असेल तर गडद रंगाची नेलपॉलिश लावा. सर्वप्रथम, क्युटिकल्सवरील रंगाचे डाग स्वच्छ करा, जेणेकरून नेलपॉलिश लावल्यानंतर तुमची नखे स्वच्छ दिसतील. यासाठी लाल, निळा, मरून अशा गडद रंगांचा वापर करता येईल. (Photo: Freepik)
-
येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photo: Pexels)

मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळं बेळगावमध्ये वाहकाला मारहाण; महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद