-
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करत असतात. यामुळे काही राजयोग किंवा अशुभ योग निर्माण होतात.
-
ग्रहांच्या स्थितीचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. दरम्यान, एक वर्षांनंतर एप्रिलमध्ये राजयोग तयार होणार आहे.
-
बुध आणि शुक्रदेवाच्या युतीने ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ निर्माण होत आहे. या राजयोगाचा सर्व राशींवर प्रभाव दिसून येईल.
-
पण, तीन राशीच्या लोकांना याचा विशेष लाभ होऊ शकतो. त्यांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
-
लक्ष्मी नारायण राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसाय मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते.
-
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग फायदेशीर ठरू शकतो. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक चांगली होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायाला नवा आयाम मिळण्याची शक्यता आहे. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात.
-
लक्ष्मी नारायण राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकतो. परदेशात जाण्याचे किंवा परदेशी कंपनीत नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्हाला बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. मालमत्तेच्या वादाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. इमारत आणि वाहनातून आनंद मिळण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : freepik\लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन