-
प्राचीन काळापासून तूप हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज एक चमचा तूप खाल्ल्याने तुमच्या जेवणाची चव वाढवतेच, पण आरोग्यासाठी भरपूर फायदेही मिळतात. गेल्या अनेक शतकांपासून पारंपरिक भारतीय औषधांमध्येही शुद्धतेचे प्रतीक आणि आयुर्वेदिक पद्धतीमध्ये मुख्य घटक म्हणून तूप किंवा कच्चं लोणी वापरले जाते. तुपाच्या सेवनामुळे शरीरावर होणाऱ्या संभाव्य सकारात्मक प्रभावासाठी समकालीन आरोग्य मंडळांमध्ये मान्यता मिळाली आहे.
-
पौष्टिक गुणधर्म : तूप हा निरोगी फॅट्चा स्त्रोत आहे, प्रामुख्याने सॅच्युरेटेड फॅट्स आणि फॅटी ॲसिडचा स्त्रोत आहे. तूप हे ए, ई आणि डी सारखे चरबी विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांनी (fats soluble vitamins) समृद्ध आहे, जे संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या व्यतिरिक्त तुपात ब्युटीरिक ॲसिड (Butyric acid) असते, एक शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड (short-chain fatty acid ) ज्यामध्ये संभाव्य दाहकविरोधी गुणधर्म असतात.
-
याबाबत इंडियन एक्स्प्रेसबरोबर संवाद साधताना यशोदा रुग्णालयातील वरिष्ठ चिकित्सक डॉ. दिलीप गुडे यांनी स्पष्ट केले की, “तुपाच्या सेवनामुळे ए जीवनसत्वाचे शोषण सुधारल्याने त्वचेचे आरोग्यही सुधारू शकते.”
पचनास मदत करते आणि सांध्यांना मजबूत करते : “आयुर्वेदिकतज्ज्ञ डॉ. रेखा राधामोनी यांनी इंडियन एक्स्प्रेसबरोबर संवाद साधताना, तूप सेवनामुळे पचनास आणि सांध्यांना मजबुती देण्यास मदत होते”, असे सांगितले. -
डॉ. कुमार यांनी असेही सांगितले की, “या शक्तिशाली फॅट्सचे प्रमाणात सेवन केल्याने हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते व सांधेदुखी कमी करण्यास मदत करते आणि हे एकंदर आरोग्यासाठी उत्तम आहे.”
-
रोगप्रतिकारकशक्ती वाढवते : तुपात चरबी विरघळवणारी जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. व्हिटॅमिन ए, विशेषतः निरोगी त्वचेसाठी महत्त्वपूर्ण आहे, रोगजनक सूक्ष्म जीवांपासून (pathogens) संरक्षण करते.
-
वजन नियंत्रण : अनेकांना असे वाटते की, तुपाच्या सेवनामुळे वजन वाढते. संतुलित आहाराचा एक भाग म्हणून मध्यम स्वरुपात तुपाचे सेवन केल्याने तृप्ती मिळाल्याची भावना मिळते. डॉ. गुडे यांनी सांगितले, “तुपातील हेल्दी फॅट्स तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले राहण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे भूक लागत नाही आणि जास्तीचे अन्न खाल्ले जात नाही; त्यामुळे वजन नियंत्रणात मदत होते.”
-
स्मरणशक्ती वाढवते : तुपाच्या सेवनाने लहान मुलांची स्मरणशक्ती, दृष्टी आणि प्रतिकारशक्ती वाढू शकते
-
तुपाचे सेवन किती प्रमाणात करावे?
तुपाचे सेवन मध्यम प्रमाणात केले पाहिजे, यावर भर देताना डॉ. गुडे यांनी सांगितले की, विशेषत: तेव्हा तुपाचे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे, जेव्हा ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती आहाराच्या मर्यादा ओलांडतात. -
डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले की, “तुपाचे जास्त सेवन केल्याने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, कारण ते सॅच्युरेटेड फॅट्सने युक्त आहे, त्यामुळे रक्तवाहिन्या बंद होऊ शकतात. खरं तर फॅटी लिव्हरच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनीही तुपाचे सेवन टाळले पाहिजे किंवा कमी केले पाहिजे.”
-
“जेव्हा तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटत असेल किंवा ॲसिडीटी आणि अपचनाचा त्रास होत असेल, तेव्हा तुपाचे सेवन टाळण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला
-
“तुपात फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल मुबलक प्रमाणात असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये हृदयाचे विकार आणि कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे वृद्धांनी त्यांचे हृदय धोक्यात येऊ नये म्हणून कच्च्या लोण्याचे सेवन टाळावे. अतिसाराचा त्रास होत असल्यास तूप खाणे टाळा, कारण तूप नैसर्गिक रेचक (laxative- मलोत्सर्जनास मदत करणारे) म्हणून काम करते”, असे डॉ. कुमार म्हणाले.

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक