-
होळी हा सण दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी हा रंगांचा खेळ आहे. लोकं एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात, पण रंग खेळताना त्वचेची आणि केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. (Photo : Pexels)
-
रंगाच्या हानिकारक परिणामांपासून त्वचा आणि केस सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. रंग आणि त्यातील रासायनिक द्रव्ये आणि त्यात उष्णता यामुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे होळीनंतर त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. (Photo : Pexels)
-
द इंडियन एक्स्प्रेसनी काही तज्ज्ञांच्या हवाल्याने त्वचेची काळजी कशी घ्यायची, याविषयी माहिती सांगितली आहे. (Photo : Pexels)
-
होळीला रंग खेळल्यानंतर त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा रसायनयुक्त रंगांमुळे त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. डॉ. गितीका मित्तल यांनी रंग खेळल्यानंतर त्वचेला कोणतीही इजा होऊ नये म्हणून काही खास टिप्स सांगितल्या आहेत. (Photo : Pexels)
-
क्लिंझरने चेहरा धुवा. चेहरा घासू नका. थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही खोबरेल तेल किंवा मायसेलर पाण्याचा वापर करा.त्वचेला कोरफड जेल लावा (Photo : Pexels)
-
रंग खेळल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी किंवा त्वचेवर लालसरपणा आला असेल तर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या. (Photo : Pexels)
-
कॅमोमाइल चहानेसुद्धा चेहऱ्यावरील लालसरपणा दूर होऊ शकतो. (Photo : Pexels)
-
त्वचा कोरडी होऊ नये म्हणून रंग खेळण्यापूर्वी आणि रंग खेळल्यानंतर भरपूर पाणी प्या. (Photo : Pexels)
-
होळीच्या पूर्वी आणि नंतर चेहऱ्यावर व्हिटॅमिन सी, हायलुरोनिक अॅसिड आणि नियासिनॅमाइड याशिवाय कोणतेही पदार्थ लावू नका. (Photo : Pexels)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड