-
Kidney Health :किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहे. (Photo: Freepik)
-
हे सर्व विषारी पदार्थ आपल्या मूत्राशयात जातात आणि लघवी करताना बाहेर पडतात. किडनी फेल्युअरची लक्षणे इतकी सौम्य असतात की हा आजार वाढत नाही तोपर्यंत बहुतेक लोकांना काही फरक जाणवत नाही.(Photo: Freepik)
-
अनेक महिला कामाच्या गडबडीत पाणी कमी पितात. तर कधी बराचवेळ लघवी थांबवून ठेवावी लागते यामुळे मुत्राशयाच्या आजारांचा धोका वाढू शकतो. (Photo: Freepik)
-
एखादी व्यक्ती एका मूत्रपिंडाशिवाय किती काळ जगू शकते? प्रत्यारोपणानंतर कोणत्या प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.(Photo: Freepik)
-
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एका किडनीवरही माणूस जगू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपली एक किडनी दान करते तेव्हा एकच किडनी उरते. तरीही लोक अगदी आरामात व्यवस्थित आपलं जीवन जगतात. (Photo: Freepik)
-
त्यांना कोणतीही समस्या उद्भवत नाही. डॉक्टर सांगतात की काही लोकांमध्ये जन्मापासून एकच किडनी काम करते तरीही ते सहजपणे त्यांचे आयुष्य कोणत्याही समस्याशिवाय जगतात.(Photo: Freepik)
-
किडनी प्रत्यारोपणानंतर शरीर बरे होण्यासाठी साधारणपणे सहा आठवडे लागतात. परंतु ही प्रक्रिया अधिक काळही असू शकते. किडनी दान केल्यानंतर ब्लड प्रेशर, लघवी तपासणी, ब्लड युरिया टेस्ट आणि संपूर्ण शरीर तपासणी वर्षातून एकदा करावी.(Photo: Freepik)
-
किडनी फेल्युअरच्या शेवटच्या टप्प्यात या आजारामुळे रक्तामध्ये अनेक प्रकारचे विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ तयार होऊ लागतात, त्यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येतो. त्यानंतर रुग्णाला किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जातो. (Photo: Freepik)
-
किडनी दान केल्यानंतर ६ आठवडे म्हणजे दीड महिन्यापर्यंत जड वस्तू उचलणे टाळा.या दरम्यान जड व्यायाम आणि क्रीडा उपक्रम टाळावेत. आहार आणि जीवनशैलीची विशेष काळजी घ्यावी.अल्कोहोल, कॅफिन आणि उच्च प्रथिनयुक्त पदार्थांपासून दूर रहा.(Photo: Freepik)

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य