-
आई होणे ही एक सुंदर भावना आहे, परंतु या काळात गर्भवती महिलेने योग्य खाण्यापासून तिच्या जीवनशैलीबद्दल अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. (Photo: Freepik)
-
प्रत्येक गर्भवती महिलेने गरोदरपणात पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. आईचा थोडासा निष्काळजीपणा देखील बाळाला हानी पोहोचवू शकतो, म्हणूनच यावेळी आहारावर नियंत्रण घेणे आवश्यक आहे.(Photo: Freepik)
-
या काळात मूड बदलणे, जेवणाची लालसा, चवीतील बदल हे सतत घडत राहतात. एकदा का एखाद्या गोष्टीची चव आवडली की ती पुन्हा पुन्हा खायची इच्छा होते. गरोदर स्त्रीला गरोदरपणात चिकन खाण्याची शिफारस केली जाते. (Photo: Freepik)
-
मात्र गर्भवती महिलांसाठी किती फायदेशीर आहे आणि ते खाताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.(Photo: Freepik)
-
चिकन हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी प्रथिने आवश्यक असतात. चिकनमध्ये असलेले प्रथिने बाळाच्या पेशी तयार करण्यास मदत करतात.(Photo: Freepik)
-
चिकनमध्ये लोह देखील भरपूर असते, जे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. हिमोग्लोबिन शरीरातील पेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते. चिकनमध्ये फॅटचे प्रमाण कमी असते.(Photo: Freepik)
-
चिकन खाण्यापूर्वी, ते चांगले शिजले आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. गर्भवती महिलांना कमी शिजवलेले किंवा कच्चे चिकन देऊ नये. (Photo: Freepik)
-
हल्ली बाजारात येणाऱ्या कोंबड्या या कृत्रिमरित्या वाढवेलल्या असतात. याचा गर्भवती महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.(Photo: Freepik)
-
गरोदरपणात आपल्या आहारात कोणत्याही खाद्यपदार्थाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.(Photo: Freepik)
Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण