-
शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. मुले तीन वर्षांची झाली की पालकांची मुलांच्या शालेय प्रवेशासाठी लगबग सुरू होते. (Photo : Freepik)
-
सुरुवातीला केजी त्यानंतर एलकेजी आणि शेवटी युकेजी असे पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते. प्राथमिक शाळेत प्रवेश देण्यापूर्वी मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणे गरजेचे आहे. (Photo : Freepik)
-
तुम्हीही तुमच्या मुलांना शाळेत घालताय का? पण तुम्हाला एलकेजी आणि युकेजीचा फूल फॉर्म माहिती आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
पूर्व प्राथमिक शाळा ही अनिवार्य नाही पण मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी मुलांनी पूर्व प्राथमिक शिक्षण घेणे गरजेचे आहे. (Photo : Freepik)
-
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यावर्षी पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी किमान तीन वर्षे तर कमाल चार वर्षे पाच महिने वयोमर्यादा नुकतीच निश्चित केली आहे. या वयोगटातील लहान मुलांना पालक हे एलकेजी आणि युकेजीचा असे क्रमवारीनुसार शाळेत घालतात. (Photo : Freepik)
-
एलकेजीचा फूल फॉर्म लोअर किंडर गार्टन ( Lower Kindergarten ) होय. जेव्हा मुलांना पहिल्यांदा शाळेत घातले जाते आणि त्यांना लिहिणे, वाचणे अशा प्राथमिक गोष्टी शिकवल्या जातात. त्यालाच लोअर किंडर गार्टन असे म्हणतात. (Photo : Freepik)
-
एलकेजीमध्ये तीन ते चार वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षण दिले जाते.किंडर गार्टन हा शब्द जर्मन असून याचा अर्थ लहान मुलांची बाग असे होतो. या शब्दावरुनच लोअर किंडर गार्टन हा शब्द घेण्यात आला आहे. (Photo : Freepik)
-
युकेजीचा फूल फॉर्म आहे अप्पर किंडर गार्टन (Upper Kindergarten) एलकेजीनंतर युकेजीला लहान मुलांना प्रवेश दिला जातो. चार वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मुले युकेजीमध्ये शिक्षण घेतात.
-
मुलांना प्राथमिक शाळेत घालण्यापूर्वी युकेजीमध्ये अनेक गोष्टी शिकवल्या जातात. युकेजी हा प्राथमिक शाळेत जाण्यापूर्वीचा महत्त्वाचा टप्पा असतो. युकेजीच्या मदतीमुळे मुलांना प्राथमिक शिक्षण घेणे सोपी जाते.

Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्यानिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images