-
सध्या उन्हाचा तडाखा वाढतो आहे. मार्च महिन्यातच उष्णता प्रचंड वाढल्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन किंवा इतर हंगामी आजारांचा त्रास होऊ शकतो. (फोटो : Freepik)
-
आपण आपल्या रोजच्या आहारात काही असे पदार्थ खातो ज्याने आपल्या शरीरातील उष्णता ही आणखीन वाढते. (फोटो : Freepik)
-
उन्हाळ्यात काही फळांचे आरोग्यदायी गुणधर्म असल्याने उन्हाळ्यात यांचे सेवन केल्यास शरीराला फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया त्या फळांबाबत. (फोटो : Freepik)
-
कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळ मानले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात या फळाचे सेवन नक्की करावे. कलिंगडात ९०% पेक्षा जास्त पाणी असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. (फोटो : Freepik)
-
उन्हाळ्यात लिंबू पाण्यामुळे तुमचे शरीर थंड राहते आणि तुम्ही ताजेतवाने राहता. दिवसातून दोनदा हलकी साखरेसोबतही सेवन करू शकता. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.(फोटो : Freepik)
-
जांभूळ हे फळ उन्हाळ्यात हमखास खायला मिळतं. चवीला आंबट-गोड व रसरशीत अशी लाबंट आकाराची जांभूळ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या फळात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. (फोटो : Freepik)
-
‘डोंगरची काळी मैना’ म्हणून ओळखले जाणारे करवंद या रानमेव्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. यात ‘क’जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आहे जे त्वचाविकारामध्ये अधिक फायदेशीर ठरते.(फोटो : Freepik)
-
करवंदामध्ये फायबरदेखील भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असल्याने हाडांसाठी देखील करवंद उत्तम आहेत.(फोटो : Freepik)
-
गावी गेल्यावर तुती हे फळ हमखास मिळतंच. तुम्हीही लहानपणी खूप तुती खाल्ले असतील. या फळात ‘अ’ जीवनसत्त्व तसेच कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते, ज्याचे उन्हाळ्यात सेवन करणे फायदेशीर ठरते. तुतीची फळं ही आंबट, गोड असतात. (फोटो : Freepik)
“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन