-
तापमान वाढल्यामुळे उन्हाळ्यात घाम येणे अगदी सामान्य आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
उन्हाळ्यात एखाद्या बरोबर हात मिळवण्याआधी हात पुसून घ्यावा लागतो, कपडे परिधान केल्यानंतर लगेचचं घामाने भिजून जातात, तर प्रचंड तहान लागते आणि घामाने पूर्ण अंग भिजून जाते आदी समस्या सगळ्यांनाच जाणवतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर या सर्वांवर उपाय म्हणून शरीर स्वच्छ राखणे , त्वचेचे रोग टाळण्यासाठी काही उपाय आपण सर्वांचीच केले पाहिजेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामापासून सुटका मिळवण्यासाठी पुढील स्टेप्स करा फॉलो… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नियमित अंघोळ करा – उन्हाळ्यात त्वचेच्या मृत पेशी, घाण, घाम आदी गोष्टींपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी नियमितपणे अंघोळ (शॉवर) करा. असे केल्याने तुमचे शरीर स्वछ राहण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सैल कपडे घाला – सैल कपडे परिधान केल्याने तुमच्या शरीरातून हवा जाण्यासाठी जागा राहते. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी हलक्या रंगांच्या कपड्यांची देखील निवड करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नियमित व्यायाम करा – नियमित व्यायाम केल्याने शरीराची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. तसेच वर्कआउट नंतर फ्रेश होण्यासाठी आणि शरीरावरील घाम निघून जाण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हायड्रेटेड राहा – उन्हाळ्यात नियमितपणे पाणी पिणे आवश्यक आहे. घामावाटे शरीरातील निघून गेलेलं पाणी पुन्हा भरून काढण्यास मदत होईल. तसेच तुमचे शरीर थंड राहण्यास मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
फेस मिस्टचा उपयोग करा – फेस मिस्ट चेहऱ्यावर शिंपडल्याने उन्हाळ्यात तुमची त्वचा हायड्रेटेड राहील आणि तुम्हाला पोषण देखील मिळेल. यामुळे जास्त घाम येणे, मुरुम येणं आणि घामामुळे इतर त्वचेच्या समस्या टाळण्यास देखील मदत होईल. (फोटो सौजन्य: @Freepik)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख