-
ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर दुसर्या राशीत प्रवेश करतो. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असं म्हटलं जातं.
-
ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला खूप महत्त्व आहे, जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनी सध्या स्वतःच्या राशी कुंभ राशीत आहे. २०२४ मध्येही शनि या राशीत राहणार आहे. परंतु शनीची हालचाल वेळोवेळी बदलणार आहे.
-
२९ जून २०२४ रोजी कुंभ राशीत असताना शनि वक्री होईल. शनि १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत कुंभ राशीत वक्री राहील.
-
शनिच्या उलट चालीमुळे १३९ दिवस काही राशीच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. शनीच्या उलट्या चालीचा कोणत्या राशींना फायदा होईल? जाणून घेऊया.
-
शनिदेव या राशीच्या एकादश भावात वक्री होणार आहेत, त्यामुळे मेष राशीच्या लोकांना शनिच्या उलट चालीचा विशेष लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना या काळात नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात चांगले यश मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत.
-
शनिदेव या राशीच्या दहाव्या भावात वक्री होणार आहेत, त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना देखील शनिच्या उलट चालीचा विशेष फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहू शकते.
-
शनिदेव या राशीच्या चतुर्थ भावात वक्री होणार आहेत, त्यामुळे या राशीच्या लोकांना शनिच्या उलट हालचालीमुळे शुभ परिणाम मिळू शकतात. यावेळी कामात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळू शकतात. तुम्ही नवीन गाडी खरेदी करू शकता. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चांगली होण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

६ एप्रिल पंचांग: रामनवमी कोणत्या राशीसाठी ठरणार भाग्यशाली? कोणाला मिळणार प्रेम, पैसा आणि प्रसिद्धी? वाचा राशिभविष्य