-
आपल्या जीवनशैली आणि आहाराचे परिणाम आपल्या त्वचेवर अनेकदा दिसतात. कधी हे आपल्यासाठी आरोग्यदायी असतात किंवा कधी याचा त्रास देखील होतो. आज आपण जाणून घेऊया अशा काही पदार्थांबद्दल जे स्कीन प्रॉब्लेम्स आणि चेहऱ्याववरील पिंपल्सला अग्रेसर करतात.
-
ज्यांना चेहऱ्यावर पिंपल्सचा त्रास होतो त्यांनी ब्रेड, गोड पदार्थ आणि पास्ता याचे सेवन टाळावे.
-
दुग्धजन्य पदार्थांमुळे स्कीन प्रॉब्लेम्स तीव्रतेने वाढतात. दुग्धजन्य पदार्थांचे दररोज सेवन करणे त्वचेसाठी हानिकारक आहे आणि त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स उद्धभवतात.
-
फास्ट फूड आणि जंक पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात त्यामुळे अनेक स्कीन प्रॉब्लेम्सचा धोका वाढतो.
-
चॉकलेट हे उष्ण पदार्थ आहे याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर आठवड्याभरात पिंपल्स येऊ शकतात.
-
प्रोटीन सप्लिमेंट्सचे सेवन केल्याने तुमच्या पेशी लवकर वाढतात आणि विभाजित होतात ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स तयार होतात.
-
कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफीन असते ज्यामुळे तुमच्या शरीरात कॉर्टिसॉलचे प्रमाण वाढते. कॉर्टिसोल हा एक स्ट्रैस हॉरमोन आहे आणि जेव्हा या हार्मोनमध्ये अनियमितता होते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर तेलाचे प्रमाण वाढते यामुळे अनेक स्कीन प्रॉब्लेम्सचा त्रास होतो.
-
केळीमध्ये जास्त प्रमाणात ग्लायसेमिक असतात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स वाढतात.
-
(All photos:Unsplash)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल