-
एप्रिल महिन्यापासूनचं तीव्र उष्णतेच्या झळा सहन कराव्यात लागत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ दिसून येत आहे. यामुळे उष्माघाताची समस्या गंभीर बनत आहे.
-
वाढत्या तापमानाचा मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलताना डॉक्टर आणि संशोधक अनेकदा ‘हीट स्ट्रेस’ हा शब्द वापरतात.
-
हीट स्ट्रेस म्हणजे जेव्हा आपले शरीर अति उष्णतेमध्ये असते, तेव्हा ते त्याचे मूळ तापमान नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते. वातावरण आणि शारीरिक परिस्थितीनुसार, शरीर आपले कोर तापमान राखण्याचा प्रयत्न करते, यामुळे थकवा जाणवू लागतो.
-
हीट स्ट्रेसच्या लक्षणांबाबत बोलायचे झाल्यास, उष्णतेचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला तर शरीराला त्रास होतो. वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये त्याचा परिणाम वेगवेगळा असतो.
-
तरी सामान्यतः दिसणार्या लक्षणांमध्ये पारा ४० ते ४२ अंशांवर गेल्यास डोकेदुखी, उलट्या, शरीरात पाण्याची कमतरता अशी लक्षणे जाणवतात, जर पारा ४५ अंश असेल तर कमी रक्तदाबामुळे बेशुध्द पडणे, चक्कर येणे किंवा अस्वस्थता येणे आणि ब्लड प्रेशची समस्या जाणवते.
-
जर तुम्ही ४८ ते ५० अंश किंवा त्यापेक्षा जास्त काळ तापमानात राहिल्यास, स्नायू पूर्णपणे अनियंत्रित होतात आणि मृत्यू देखील होऊ शकतो.
-
अशा परिस्थितीत लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला किंवा आजारी व्यक्ती लवकर बळी पडू शकतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
-
जास्तीत जास्त तापमान किती तापमान मनुष्य जगू शकतो याचे अचूकपणे देता येत नाही. कारण आपल्या पृथ्वीवर निरनिराळ्या प्रकारचे हवामान आहे आणि शरीर देखील भिन्न क्षमतांनी युक्त आहेत.
-
या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकेल असा कोणताही अभ्यास आजपर्यंत नाही. पण ४० ते ४५ अंश सेल्सिअस तापमानानंतर सामान्य स्थिती असलेल्या प्रत्येक व्यक्तीने सावध आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
-
मानवी शरीराचे सामान्य तापमान ९८.४ अंश फॅरेनहाइट किंवा ३७.५ ते ३८.३ अंश सेल्सिअस असते. याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला ३८ किंवा ४० डिग्री सेल्सिअस तापमानात उष्णता जाणवत नाही.
-
खरं तर, हे शरीराचे मुख्य तापमान आहे. म्हणजेच, त्वचेच्या पातळीवर कमी तापमान देखील जाणवू शकते.
-
त्यामुळे वाढत्या तापमानात सुरक्षित राहण्यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवा, उन्हात जाणं टाळा, चहा, कॉफीचं सेवन टाळ, मसालेदार अन्न खाणे टाळा आणि मांसाहारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. (फोटो- नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेसस फ्रीपिक)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल