-
Keratin Treatment: स्त्रियांचे सौंदर्य हे त्यांच्या केसांवरच अवलंबून असते. अनेकदा स्त्रिया त्यांच्या त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्याबद्दल खूप जागरूक असतात. प्रत्येक स्त्रीला असे वाटत असते की, आपले केस सरळ लांबलचक आणि सिल्की असावेत. (फोटो : Freepik)
-
काही स्त्रिया या बाबतीत नशीबवान असतात की, त्यांचे ओरिजनल केस सरळ आणि लांबलचक असतात. तर, काही महिला यासाठी पार्लर किंवा हेअर स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट घेतात. तुम्हीसुद्धा यातल्याच आहात का?(फोटो : Freepik)
-
तुम्हीही केस सरळ करण्यासाठी हेअर स्ट्रेटनिंग प्रॉडक्ट वापरत असाल, तर सावधान! केस सरळ करण्यासाठी रासायनिक उत्पादन वापरणे तुमच्या जीवावर बेतू शकते. कारण- याचा थेट परिणाम मूत्रपिंडावर होऊ शकतो.(फोटो : Freepik)
-
संशोधनानुसार केस सरळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कधीतरीच हेअर स्ट्रेटनिंग करणे आणि हेअर स्ट्रेटनिंग उत्पादनांचा अधूनमधून वापर केल्यास फारसा धोका निर्माण होत नाही.(फोटो : Freepik)
-
केसांसाठी वारंवार रासायनिक उत्पादनांचा वापर केल्यानं मूत्रपिंडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे महिलांनी याबाबत खूप सावध राहिले पाहिजे.(फोटो : Freepik)
-
केस सरळ करणाऱ्या उत्पादनांमुळे मूत्रपिंडांचे नुकसान होऊ शकते का? तर हो. याचा मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो. हेअर स्ट्रेटनिंगच्या ट्रीटमेंटप्रसंगी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमुळे त्वचा खराब होऊ शकते. (फोटो : Freepik)
-
केराटिन ट्रीटमेंटमध्ये ग्लायऑक्सिलिक अॅसिड अधिक प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे केस मजबूत होत असले तरी त्यामुळे ऑक्झलेट क्रिस्टल्स जमा होऊन मूत्रपिंडांची कार्यक्षमता कमी होऊ शकते.(फोटो : Freepik)
-
“ज्यांना मूत्रपिंडाच्या समस्या आहेत, त्यांनी ही हेअर स्ट्रेटनिंगला वापरली जाणारी रसायनयुक्त उत्पादने वापरणे टाळावे. या हानिकारक उत्पादनांच्या अतिरिक्त वापरामुळे मूत्रपिंडे निकामी होऊ शकता. (फोटो : Freepik)
-
केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी केराटिन उपचार अधिक प्रमाणात केले जात आहेत. पण, हा उपचार आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, अशी माहिती नव्या अभ्यासातून समोर आली आहे. (फोटो : Freepik)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण