-
आज ८ एप्रिल रोजी २०२४ वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. सूर्यग्रहण केव्हा, कसे आणि का होते हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते.
-
याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेऊया सूर्य ग्रहण कसे होते आणि हिंदू धर्मानुसार सूर्यग्रहणाशी निगडीत काही बाबी.
-
सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. सूर्यमालेत सूर्य स्थिर असतो आणि इतर ग्रहांप्रमाणेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरतो.
-
या दरम्यान अशी एक वेळ येते की चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. यामुळेच सूर्याकडून पृथ्वीवर येणारा प्रकाश काही वेळेसाठी खंडित होतो. याला सूर्यग्रहण म्हणतात.
-
सूर्यग्रहणाचे एकूण तीन प्रकार आहेत. यातील पहिला प्रकार म्हणजे संपूर्ण सूर्यग्रहण. जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो तेव्हा पृथ्वीचा काही भाग काही मिनिटांसाठी अंधारमय होतो, यालाच संपूर्ण सूर्यग्रहण असे म्हटले जाते.
-
आंशिक सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्याचा केवळ काही भाग झाकतो यामुळे पृथ्वीवर आंशिक सावली निर्माण होते.
-
कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्र सूर्याच्या कडेला पूर्णपणे झाकत नाही आणि आकाशात एक चमकदार कडा दिसतो. याला फायर ऑफ रिंग म्हणतात.
-
हिंदू पौराणिक कथेनुसार, जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा राक्षस स्वरभानूने त्याचे रूप बदलले आणि अमृत पिण्यासाठी तो सूर्य आणि चंद्राच्या मध्ये बसला. तो अमृत पिणार तोच भगवान विष्णूने त्याला ओळखले आणि सुदर्शन चक्राने राक्षसाचा शिरच्छेद केला.
-
यानंतर राक्षसाच्या मस्तकाला राहू आणि धडाला केतू हे नाव पडले. असे मानले जाते जेव्हा जेव्हा राहू आणि केतू सूर्य आणि चंद्राला वेढतात तेव्हा सूर्य आणि चंद्राचे ग्रहण होते.
-
असे मानले जाते की जेव्हाही सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होते तेव्हा वातावरणात नकारात्मकता वाढते. त्यामुळे ग्रहणकाळात पूजा, पठण आणि कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते. तथापि, ग्रहणाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी मंत्रोच्चार आणि देवाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो.
-
इतकेच नाही तर सूर्यग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ग्रहणाच्या सुतक काळात काहीही खाण्यास मनाई केली जाते. तसेच अन्नपदार्थांवर ग्रहणाचा कोणताही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून त्यामध्ये तुळशीची पाने टाकण्याचा सल्ला दिला जातो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स