-
मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा हा सण, जो महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात अन् उत्साहात साजरा केला जातो. (photo credits-@ompsyram/instagram)
-
कुटुंबासह अगदी पारंपारिक पद्धतीने गुढी उभारुन विधीवत पूजा करुन हा सण साजरा केला जातो. (photo credits-@ompsyram/instagram)
-
या सणानिमित्त महिला खास तयारी करतात. गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रांमध्ये महिला खास महाराष्ट्रीयन नऊवारी किंवा पैठणी साडी, पारंपारिक दागिने आणि सुंदर मेकअप हेअर स्टाईल करुन सहभागी होतात. (photo credits-@ompsyram/instagram)
-
यंदा तुम्हालाही गुढी पाडव्यानिमित्त अस्सल महाराष्ट्रीय लूक कॅरी करायचा असेल तर खालील टिप्स फॉलो करा. सणनिमित्त व्हायब्रंट रंगांची साडी निवडवा. कारण या साड्या अगदी उठून दिसतात.(photo credits-@ompsyram/instagram)
-
यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य सांगणाऱ्या नऊवारी आणि पैठणी साड्यांचा पर्याय निवडला पाहिजे. यासाठी हिरवा, निळे, गुलाबी आणि नारंगी अशा रंगाच्या साड्या नेसू शकता. कारण हे रंग उत्सवाचे वातावरण देतात आणि लूक छान ब्राईट दिसतो. (photo credits-@ompsyram/instagram)
-
यासह नऊवारी साडी, गळ्यात पारंपारिक दागिने आणि डोक्यावर फेटा बांधून तुम्हाला अस्सल मराठमोळा रॉयल लूक मिळेल. यासह उन्हाळा सुरु असल्याने तुम्ही गॉगल देखील कॅरी करु शकता. (photo credits-@ompsyram/instagram)
-
यात दागिन्यांमध्ये तुम्ही मोत्यांची ज्वेलरी मग अगदी नाकातली नथ, कानातले झुमके, अंगठी ते हातातील बांगड्यांपर्यंत सर्व मोत्यांची ज्वेलरी घालू शकता. हलक्या रंगाच्या पैठणी साड्यांवर हे दागिने खूप छान दिसतात.(photo credits-@ompsyram/instagram)
-
यासह गोल्डन पारंपारिक ज्वेलरीमध्येही अनेक पर्याय आहेत. तुम्ही नऊवारी साडीवर कोल्हापूर साज, ठुशी, बोरमाळ, बुगडी, राणीहार, नथ घालू शकता. (photo creadit – @saaiii___ /instagram)
-
जर केसांचा अंबाडा बांधणार असाल तर मोगऱ्याचा गजरा माळायला विसरु नका, तसेच मरून रंगाची चंद्राच्या आकाराची टिकली लावायला विसरू नका. (photo creadit – @navyakatkar /instagram)
-
गजऱ्यामुळे तुमच्या मराठमोळा लूक आणखी खिलून दिसेल. याशिवाय कोल्हापुरी चप्पल घालून महाराष्ट्रीयन लूक पूर्ण करा. (photo creadit – @saaiii___ /instagram)
-
तुमच्या छान नऊवारी साडी असेल पण त्यावर मॅचिंग ब्लाउज नसेल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ब्लाउज देखील घालू शकता.(photo creadit -@saaiii___ /instagram)
-
यासह तुम्ही वेगवेगळ्या थीमवर आधारिक गेटअप करु शकता. (photo credits-@ompsyram/instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”